मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खास फोटो शेअर करत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने ट्विटरच्या माध्यमातून या खास शुभेच्छा दिल्या आहेत. "जगात खूप बळकट अशा भिंती(वॉल) आपल्याला माहित असतील परंतु यातील सर्वात भक्कम आणि महान भिंत (वॉल) ही म्हणजे राहुल द्राविड आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जॅमी. तुला अंडर १९ क्रिकेट विश्वचषकासाठी शुभेच्छा
राहुल द्रविड आज वयाची ४५ वर्ष पूर्ण करत आहे. तो सध्या भारतीय अंडर १९ संघाचा प्रशिक्षक असून संघासोबत न्यूझीलँडला विश्वचषकासाठी गेला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण ही तिकडी भारताकडून एकत्र तब्बल 118 सामने खेळली आहे. हा एक मोठा विक्रम आहे. भारतीय क्रिकेटच्या सुवर्णकाळात द्रविड आणि सचिन हे भारतीय संघाचे अविभाज्य भाग होते.
आज ४५ वर्षांच्या झालेल्या द्रविडने १९९५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने १६४ कसोटी सामन्यांमधील 286 डावांमध्ये १३ हजार २८८ धावा केल्या होत्या. तर ३४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १० हजार ८८९ धावा फटकावल्या होत्या. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये जबरदस्त छाप पाडणाऱ्या द्रविडला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट खेळण्याची संधी मात्र फारशी मिळाली नाही. कारकीर्दीच्या अखेरीस २०११ साली त्याने आंरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमेव टी-२० सामना खेळला होता. 11 जानेवारी रोजी जन्मलेल्या राहुल द्रविडला जॅमी या टोपण नावाने ओळखले जाते. द्रविडचे वडील किसान कंपनीमध्ये काम करत होते. त्याठिकाणी जॅम बनवला जात असे. त्यामुळे द्रविडच्या टिफीनमध्ये बऱ्याचदा जॅमचा समावेश असे, त्यामुळे मित्रांनी त्याला जॅमी हे टोपणनाव दिले होते.
भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागनं द्रविडला आनोख्या शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. विरुनं आपल्या हटके स्टाईलनं ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये सेहवागनं द्रविडची चीनच्या भिंतीशी तुलना करत लिहिलं की, 'चीनच्या भिंतीला हलवलं किंवा पाडलं जाऊ शकतं. मात्र दुसऱ्या फोटोतली भिंत(राहुल द्रविड) अतूट आहे. याच्या मागे बसा आणि सुरक्षित प्रवास करा. सेहवागनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिला फोटो चीनच्या भिंतीचा आहे तर दुसऱ्या फोटोत सेहवाग द्रविडच्या मागे बाईकवर बसला आहे.
11 जानेवारी 1972 ला द्रविडचा जन्म इंदुर येथे झाला होता. द्रविड भारताच्या क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहे. सध्या द्रविड न्यूझीलंडमध्ये असून अंडर-19 वर्ल्ड कपसाठी संघाचे प्रशिक्षक म्हणून तेथे उपस्थित आहे. ज्युनिअर क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणार द्रविड सध्या भारताच्या १९ वर्षांखालील संघासह १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या तयारीत गुंतला आहे. दरम्यान, भारताच्या १९ वर्षांखालील संघाने न्यूझीलंडमध्ये द्रविडचा वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेट केला. तसेच आपल्या लाडक्या प्रशिक्षकास शुभेच्छा दिल्या. भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने केक कापून साजरा केला. यावेळ कर्णधार पृथ्वी शॉ याने द्रविडच्या चेहऱ्यावर केक लावला. त्यानंतर इतर खेळाडूंनीही द्रविडच्या चेहऱ्यावर केक लावण्यासाठी गर्दी केली. द्रविडच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. भारताच्या ज्युनियर संघाबरोबरच टीम इंडियामधील द्रविडच्या माजी सहकाऱ्यांनीसुद्धा द्रविडला शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंग यांनी द्रविडला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
राहुल द्रविडचं करिअर द्रविडने 344 वनडे सामन्यांमध्ये नाबाद राहत 71.25 च्या स्ट्राईक रेटने 10889 रन्स केलेत. यात द्रविड 12 शतकं आणि 83 अर्धशतकं लगावले. तर द्रविडने 164 टेस्ट सामन्यांमधील 286 खेळींमध्ये 13288 रन्स केलेत. आश्चर्यजनक बाब म्हणजे द्रविड वनडे सामन्यांमध्ये 57 वेळा आणि टेस्टमध्ये 52 वेळा बोल्ड झाला होता.