IND vs SA, Rahul Dravid Dance: राहुल द्रविडचा भन्नाट डान्स; फॅन्स म्हणाले, 'इंदिरानगर का गुंडा झकास नाचतोस'

द्रविडच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. फॅन्सनाही त्याचा डान्स खूप आवडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 06:50 PM2022-01-01T18:50:33+5:302022-01-01T18:56:40+5:30

whatsapp join usJoin us
Rahul Dravid Dance with Team India South African Staff Fans says Indiranagar ka Gunda | IND vs SA, Rahul Dravid Dance: राहुल द्रविडचा भन्नाट डान्स; फॅन्स म्हणाले, 'इंदिरानगर का गुंडा झकास नाचतोस'

IND vs SA, Rahul Dravid Dance: राहुल द्रविडचा भन्नाट डान्स; फॅन्स म्हणाले, 'इंदिरानगर का गुंडा झकास नाचतोस'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SA, Rahul Dravid Dance: भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने देशाबाहेर पहिली कसोटी जिंकली. आफ्रिकेला त्यांचाच गड मानल्या जाणाऱ्या सेंच्युरियनच्या मैदानावर भारताने पराभूत केले. अशी कामगिरी करणारा भारत पहिला आशियाई संघ ठरला. केएल राहुलचे शानदार शतक आणि मोहम्मद शमीचे ८ बळी हे या विजयाचे विशेष आकर्षण ठरलं. या विजयानंतर भारतीय संघ जेव्हा हॉटेलमध्ये परतला. त्यावेळी भारतीय खेळाडूंनी झकासपैकी झुलू डान्स केला. यावेळी द्रविड गुरूजीही मागे राहिले नाहीत. द्रविडनेदेखील थोड्या वेळासाठी का होईन पण त्यावर ठेका धरला. द्रविडच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होताच फॅन्सना द्रविडचा 'इंदिरानगर का गुंडा' अवतार आठवला.

भारतीय संघ हॉटेलमध्ये परतण्यासाठी बससमधून उतरत होता. सर्वप्रथम कर्णधार विराट कोहली उतरला आणि पाठोपाठ द्रविडही बसमधून बाहेर आला. त्यावेळी तेथील स्टाफने त्यांना डान्स करायला लावलं. विराटनेही क्षणाचा विलंब न लावता ठेका धरला. द्रविडदेखील संघाच्या विजयाबद्दल डान्स करताना दिसला. त्याचा व्हिडीओ लगेच व्हायरल झाला. इंदिरानगर का गुंडा सुपर्ब डान्स अशा प्रकारच्या कमेंट्स त्याला फॅन्सकडून मिळाल्या.

द्रविडचा डान्स अन् कमेंट्स-

--

--

पहिल्या कसोटी विजयानंतर आता भारतीय संघ मालिकेत आणखी दोन कसोटी सामने खेळणार आहे. सोमवारपासून दुसरी कसोटी सुरू होणार आहे. त्यानंतर १९ जानेवारी ते २३ जानेवारी या दरम्यान भारतीय संघ वन डे मालिकाही खेळणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा अनफिट असल्याने संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे सोपवण्यात आले आहे.

Web Title: Rahul Dravid Dance with Team India South African Staff Fans says Indiranagar ka Gunda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.