ऑस्ट्रेलिया दौरा सोपा नसेल; राहुल द्रविडनं कॅप्टन विराट कोहलीला सांगितला धोका

2018-19च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ऐतिहासिक विजयाच्या पुनरावृत्तीसाठी टीम इंडिया आतुर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 12:41 PM2020-06-11T12:41:13+5:302020-06-11T12:42:25+5:30

whatsapp join usJoin us
Rahul Dravid fires Steve Smith-David Warner warning to Virat Kohli for Australia tour | ऑस्ट्रेलिया दौरा सोपा नसेल; राहुल द्रविडनं कॅप्टन विराट कोहलीला सांगितला धोका

ऑस्ट्रेलिया दौरा सोपा नसेल; राहुल द्रविडनं कॅप्टन विराट कोहलीला सांगितला धोका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टीम इंडियानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2018-19च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली होती. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी कसोटी मालिकेत नमवणारा भारत हा पहिला आशियाई देश ठरला होता. या वर्षाअखेरीत भारतीय संघ पुन्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे आणि दोन वर्षांपूर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी विराट सेना आतुर आहे. पण, यंदाचा दौरा सोपा नसेल, असे ठाम मत भारताचा दिग्गज फलंदाज राहुल द्रविडनं व्यक्त केलं. द्रविडनं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला या दौऱ्यातील धोके सांगितले.

''संघात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे नसणे, ही ऑस्ट्रेलियासाठी मोठी डोकेदुखी होती. या दोघांचा संघावरील प्रभाव सर्वांनाच माहित आहे. ते अव्वल फलंदाज आहेत आणि संघासाठी ते खोऱ्यानं व सातत्यानं धावा करतात,'' असे मत द्रविडनं सोनी टेन पीट स्टॉप या कार्यक्रमात व्यक्त केलं. चेंडू कुरतडण्याप्रकरणी या दोघांवर एका वर्षाची बंदी होती आणि त्यामुळे त्यांना मागच्या दौऱ्यावर खेळता आले नव्हते. पण, यंदाच्या दौऱ्यात ते खेळणार आहेत आणि टीम इंडियासाठी ही दोघं डोकेदुखी ठरू शकतील, असा अंदाज द्रविडनं व्यक्त केला.

द्रविड म्हणाला,''अॅशेल मालिकेत स्मिथची बॅट ज्या पद्धतीनं तळपली, त्यानंतरचा निकाल आपण पाहिलाच आहे. त्या मालिकेत वॉर्नर फॉर्मात नव्हता. पण, त्याची उणीव मार्नस लॅबुशेननं भरून काढली. तरीही स्मिथ व वॉर्नर हे भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत त्यांची छाप पाडतील. त्यामुळे भारतासाठी यंदाचा दौरा सोपा नक्की नसेल. मागील दौऱ्यावर स्मिथ व वॉर्नर यांची उणीव जाणवल्याचे ऑस्ट्रेलियाकडूनही वारंवार सांगण्यात आले. पण, आता तसे नसेल आणि दोन्ही संघांतील तगड्या खेळाडूंमधली चुरस पाहायला नक्की आवडेल.''

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 3 डिसेंबरला पहिला कसोटी सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला अॅडिलेड येथे दुसरा, 26 डिसेंबरला मेलबर्न येथे तिसरा आणि 3 जानेवारी 2021मध्ये सिडनी येथे चौथा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. पण, कोरोना व्हायरसमुळे अजूनही या मालिकेवर शिक्कामोर्तब झालेला नाही. 
चार कसोटी सामन्यांसह टीम इंडिया येथे तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. 

पाहा संपूर्ण वेळापत्रक
 

  • ट्वेंटी-20 मालिका

11 ऑक्टोबर - ब्रिस्बेन
14 ऑक्टोबर - कॅनबेरा
17 ऑक्टोबर - अॅडलेड
 

  • कसोटी मालिका

वि. भारत, गॅबा, 3 ते 7 डिसेंबर
वि. भारत, अॅडलेड, 11 ते 15  डिसेंबर
वि. भारत, मेलबर्न, 26- 30 डिसेंबर
वि. भारत, सिडनी, 3 ते 7 जानेवारी 2021

  • वन डे मालिका

12 जानेवारी 2021 - पर्थ
15 जानेवारी 2021 - मेलबर्न
17 जानेवारी 2021 - सीडनी  

IPL 2020 खेळवणारच, BCCIने कसली कंबर; सौरव गांगुलीनं राज्य संघटनांना पाठवले पत्र

भावा स्वतःच्या जीवावरच मी इतकी वर्ष खेळलो; रोहित शर्माच्या ट्विटला Yuvraj Singhचं उत्तर

क्वारंटाईन सेंटरमध्ये रंगली क्रिकेट मॅच; माजी मुख्यमंत्र्यांनी शेअर केलेला Video लाखोंनी पाहिला

#MissYouYuvi ट्रेंडवर युवराज सिंगची पत्नी हेझल किचची प्रतिक्रिया, म्हणते...

Web Title: Rahul Dravid fires Steve Smith-David Warner warning to Virat Kohli for Australia tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.