नवी दिल्ली : सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध (IND vs AUS) टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यामध्ये टी-20 मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील अखेरचा सामना 4 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. अशातच भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला (BCCI) एक आवाहन केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर होणाऱ्या टी-20 विश्वचशकासाठी भारतीय खेळाडूंना लवकर रवाना करावे असे द्रविडने म्हटले आहे. नियोजित वेळापत्रकानुसार विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांविरूद्ध सराव सामने खेळणार आहे.
दरम्यान, द्रविडने बीसीसीआयकडे भारतीय संघासाठी आणखी सराव सामने आयोजित करण्याची विनंती करण्यात आली आहे. यापूर्वी भारतीय खेळाडू 9 ऑक्टोंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार होते, मात्र द्रविडच्या विनंतीनंतर आता 5 ऑक्टोबरला संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याची शक्यता आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियामध्ये 2-3 आणखी सराव सामने खेळू शकेल. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले, "आम्ही काही संघांशी चर्चा करत आहोत जे आयसीसीने आयोजित केलेल्या सराव सामन्यांव्यतिरिक्त आमच्यासोबत सामने खेळतील. द्रविड आणि त्याच्या सपोर्ट स्टाफसह टी-20 विश्वचषकाचा संपूर्ण संघ 5 ऑक्टोंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.
ICC च्या नियोजित वेळापत्रकानुसार सराव सामने 10 ऑक्टोंबर - वेस्टइंडिज विरूद्ध यूएईस्कॉटलंड विरूद्ध नेदरलॅंडश्रीलंका विरूद्ध झिम्बाब्वे
11 ऑक्टोंबर - झिम्बाब्वे विरूद्ध आयर्लंड
12 ऑक्टोंबर -वेस्टइंडिज विरूद्ध नेदरलॅंड
13 ऑक्टोंबर -झिम्बाब्वे विरूद्ध नामिबियाश्रीलंका विरूद्ध आयर्लंडस्कॉटलंड विरूद्ध आयर्लंड
17 ऑक्टोंबर -भारत विरूद्ध ऑस्ट्रेलियान्यूझीलंड विरूद्ध दक्षिण आफ्रिका इंग्लंड विरूद्ध पाकिस्तानअफगाणिस्तान विरूद्ध बांगलादेश
19 ऑक्टोंबर -अफगाणिस्तान विरूद्ध पाकिस्तान बागंलादेश विरूद्ध दक्षिण आफ्रिका भारत विरूद्ध न्यूझीलंड
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न13 नोव्हेंबरला अंतिम सामना