Join us  

Rahul Dravid : राहुल द्रविडच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाणार; राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदासाठी BCCIने मागवले अर्ज

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुख पदासाठी अर्ज मागवले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 4:24 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुख पदासाठी अर्ज मागवले आहेत. ८ जुलै २०१९पासून राहुल द्रविड ( Rahul Dravid) NCA चा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. बीसीसीआयनं आता या पदासाठी अर्ज मागवल्यामुळे राहुल द्रविडकडे मोठी जबाबदारी सोपवण्याची तयारी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघानं नुकताच श्रीलंका दौरा केला. बीसीसीआयनं दिलेल्या जाहिरातीनुसार NCA प्रमुख हे बीसीसीआय सचिव जय शाह यांना रिपोर्ट करेल आणि त्याला दोन वर्षांचा करार दिला जाईल.

हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ आहे का?; ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेलं पत्र व्हायरल

त्याला हाताखाली २५-३० जणांची टीम असेल आणि त्यापैकी १२ हे थेट NCA हेडला रिपोर्ट करतील. ''राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील सर्व क्रिकेट कोचिंग प्रोग्राम्सची जबाबदारी NCA प्रमुखाची असेल. त्याची तयारी, विकास आराखडा आणि सर्व क्रिकेटपटूंची कामगिरी सुधारण्यासाठीची ट्रेनिंग याची जबाबदारी त्याला पाहावी लागणार आहे. देशातील उदयोन्मुख व युवा खेळाडूंना घडवण्याचं काम NCA प्रमुख करेल,'' असे बीसीसीआयच्या सूत्रांनी ANIला सांगितले.

भारताच्या राखीव खेळाडूंची फौज घेऊन शिखर धवनच्या नेतृत्वाखाली हा संघ श्रीलंका दौऱ्यावर खेळला होता अन् तेथे वन डे मालिका २-१ अशी जिंकली होती. तर कोरोना व्हायरसमुळे भारताचे ९ प्रमुख खेळाडू विलगिकरणात असल्याने ट्वेंटी-२० मालिकेत पराभव पत्करावा लागला. या मालिकेसाठी निवडलेल्या संघातील बरेच युवा खेळाडू हे NCAमध्ये द्रविडच्या मार्गदर्शनाखाली घडले आहेत. त्यामुळे द्रविडकडे आता आणखी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. द्रविडनं २०१५ ते २०१९ या कालावधीत भारत अ व १९ वर्षांखालील संघासोबत काम  केलं आहे. 

राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास तयार आहे का?राष्ट्रीय संघाचा पूर्णवेळ कोच बनण्याचा अद्याप विचार केलेला नाही, असे द्रविडने स्पष्ट केले आहे. द्रविड म्हणाला, ‘पुढच्या भविष्याचा विचार केलेला नाही. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला या खेळाडूंसोबत काम करायला आवडते. अन्य कुठलीही बाब डोक्यात येत नाही. पूर्णकालीन भूमिका बजावताना अनेक आव्हाने येतात, त्यामुळे मी वास्तवात शिरू इच्छित नाही. 

सध्याचे कोच रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकासह अर्थात १४ नोव्हेंबरनंतर संपणार आहे. ते सध्या ५० वर्षांचे असल्याने पुन्हा अर्ज भरतील का, हे नक्की नाही. कोचपदासाठी वयोमर्यादा ६० पर्यंत आहे. युवा संघ येथे पराभूत झाला. त्यांच्या कामगिरीवर नाराज आहात का, या प्रश्नाच्या उत्तरात द्रविड म्हणाला, ‘नाही. सर्व युवा खेळाडू अनुभवातून शिकतील. श्रीलंका संघाने दमदार गोलंदाजी केली. अशा खेळपट्ट्यांवर धावा काढण्याचे आणि बळी घेण्याचे तंत्र आमच्या युवा खेळाडूंना शिकावे लागेल.’

टॅग्स :राहूल द्रविडबीसीसीआय
Open in App