Join us  

चांगला पैसा मिळाला तर मीच ते काम करेन; द्रविडचा रिप्लाय चर्चेत

द्रविडच्या क्रिकेटमधील चढ उताराच्या प्रवासावर एक झक्कास चित्रपट होईल. चॅम्पियन कोचनं यावर मजेशीर अंदाजात दिला रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 1:50 PM

Open in App

राहुल द्रविडचं क्रिकेटमध्ये मोठं योगदान आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहिले आहेत. संघाचे नेतृत्व असो की, विकेटमागची जबाबदारी जे दिलं ते त्यानं निभावलं. त्याला वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग होता आले नाही. पण वर्ल्ड चॅम्पियन कोचचा टॅग त्याला लागला. त्याच्या या सर्व प्रवासाचा एक चित्रपट होऊ शकतो. 

बायोपिकसंदर्भातील प्रश्नावर द्रविडचा मजेशीर रिप्लाय

याच पार्श्वभूमीवर त्याला एक खास प्रश्न विचारण्यात आला होता. जर तुझ्यावर बायोपिक आला तर त्यात कोणाला मुख्य भूमिकेत पाहायला आवडेल? असा प्रश्न द्रविडला विचारण्यात आला होता. यावर मिस्टर रिलायबलनं स्वत: रोलसाठी तयार आहे, असे मजेशीर उत्तर दिले. ज्याची सध्या चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.

नेमकं काय म्हणाला द्रविड?

CEAT क्रिकेट पुरस्कार २०२४ सोहळ्यात राहुल द्रविडला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी जर तुझ्यावर बायोपिक आला तर त्यात मुख्य भूमिका कोण करेल? असा प्रश्न द्रविडला विचारण्यात आला होता. यावर द्रविडनं अगदी मजेशीर अंदाजात उत्तर दिले. जर पैसे चांगले मिळत असतील तर मी देखील भूमिका साकारण्यात तयार होईन, असे तो म्हणाला. त्याच्या या रिप्लाय सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. 

 "इंदिरा नगरचा गुंडा" झाल्याचा सीन चांगलाच गाजला

राहुल द्रविड हा त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. तो अनेक जाहिरातीमध्ये दिसला आहे. पण काही महिन्यांपूर्वी एका जाहिरातीच्या माध्यमातून त्याचे एक वेगळं रूप पाहायला मिळाले होते. "इंदिरा नगरचा गुंडा" ही जाहिरात चांगलीच गाजली होती. ज्यात द्रविड आपल्या हातातील बॅटने वाहनांच्या काचा फोडताना दाखवण्यात आले होते. त्याच्या आईला ही जाहिरात चांगलीच खटकली होती. पण जर द्रविडवर चित्रपट आला आणि तो हिरो झाला तर मात्र द्रविडच्या चाहत्यांसह त्याच्या आई देखील ही गोष्ट नक्कीच आवडेल. 

भारतीय क्रिकेटरच्या आयुष्यावर चित्रपट काढण्याचा एक सिलसिलाच आपल्याकडे सुरु झाल्याचे दिसून येते.  मास्टर ब्लास्टर सचिन पासून ते अगदी धोनी आणि आता युवराज सिंगवर चित्रपट काढण्याची तयारी सुरु आहे. त्यात भविष्यात द्रविड पर्व पाहायला मिळाले, तर चाहत्यांसाठी ती एक पर्वणीच ठरेल. 

 

टॅग्स :राहुल द्रविडऑफ द फिल्डभारतीय क्रिकेट संघ