इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील (India vs England Test) विजयानंतर भारतीय संघाचं क्रीडा विश्वात कौतुक केलं जात आहे. यात मुख्यत्वे: युवा खेळाडू वॉशिंग्टन सुंदरच्या (washington sundar ) कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अहमदाबाद कसोटीत वॉशिंग्टनचं शतक अवघ्या चार धावांनी हुकलं. भारतीय संघाचे अव्वल दर्जाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर त्यानं मैदानात टिच्चून फलंदाजी करत नाबाद ९६ धावांची खेळी साकारली होती. (rahul dravid prediction on washington sundar batting comes true)
सामना सुरू असतानाच भारतीय संघाचे माजी फलंदाजी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (VVS Laxman) यांनी वॉशिंग्टन सुंदर याच्या फलंदाजीबाबत माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडनं (Rahul Dravid) केलेल्या भविष्यवाणीची आठवण करुन दिली. वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीपेक्षा त्याची फलंदाजी जास्त मजबूत आहे, असं वक्तव्य राहुल द्रविडनं काही वर्षांपूर्वी केलं होतं. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वॉशिंग्टननं राहुल दव्रिडच्या भविष्यवाणीला खरं ठरवलं आहे.
वॉशिंग्टन सुंदर भारताच्या अंडर-१९ संघाकडून खेळत असताना राहुल दव्रिडनं वॉशिंग्टनबाबत भविष्यवाणी केली होती. त्यावेळी दव्रिडकडे अंडर-१९ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा कार्यभार होता.
राहुल द्रविडची युवा खेळाडूंवरील मेहनत कामी आलीभारतीय संघासाठी 'द वॉल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडनं अंडर-१९ क्रिकेट संघासाठी अनेक महत्वाचे खेळाडू घडविण्याचं काम केलं आहे. राहुल द्रविड यांनी भारतीय युवा खेळाडूंवर घेतलेली मेहनत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कामी आली. राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणामुळे शुबमन गिलं, पृथ्वी शॉ, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदरसारखे गुणवान खेळाडू मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबावाच्या परिस्थितीला कसं सामोरं जावं? याचं प्रशिक्षण युवा खेळाडूंना देण्यावर राहुल द्रविड यांनी भर दिला. याचाच भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फायदा झाला.