भारतीय संघ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. बीसीसीआयनं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी व इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी 20 सदस्यीय संघ जाहीर केला. पण, यात कुलदीप यादवचं नाव नसल्यानं भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड व्यक्त झाला. ( India's former captain Rahul Dravid). बीसीसीआयनं निवडलेला संघ हा संतुलित असल्याचे मत व्यक्त करून द्रविड म्हणाला, कुलदीप यादवची निवड न होणे योग्य आहे.
तो म्हणाला,''भारतीय संघ संतुलित वाटत आहे. कुलदीप यादव मागील काही काळापासून अपयशी ठरत आहे. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनी दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना संतुलित संघ हवाय, याबाबत ते स्पष्ट आहेत.''
टीम इंडियाचा इंग्लंड दौरा
- १८ ते २३ जून - भारत विरुद्ध न्यूझीलंड ( जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल)
भारत वि. इंग्लंड कसोटी मालिका
- ४ ते ८ ऑगस्ट - पहिली कसोटी
- १२ ते १६ ऑगस्ट - दुसरी कसोटी
- २५ ते २९ ऑगस्ट - तिसरी कसोटी
- २ ते ६ सप्टेंबर - चौथी कसोटी
- १० ते १४ सप्टेंबर - पाचवी कसोटी
राहुल द्रविडची भविष्यवाणी ( Rahul Dravid Predicts India-England Series Winner)
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 3-2 अशा फरकानं विजयी ठरेल, असा विश्वास राहुल द्रविडनं व्यक्त केला. तो म्हणाला,''ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील विजयानंतर भारतीय संघात आत्मविश्वास निर्माण झाला आहे आणि इंग्लंड दौऱ्यासाठी ते सज्ज आहेत. संघातील अनेक फलंदाजांना इथे खेळण्याचा अऩुभव आहे. त्यामुळे कसोटी मालिका जिंकण्याची हीच सर्वोत्तम संधी आहे, कदाचित ही मालिका आपण 3-2 अशी जिंकू. ''
भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव; लोकेश राहुल व वृद्धीमान सहा यांची निवड फिटनेस टेस्टनंतर; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला.