भारतीय संघाने आणखी एक कसोटी तीन दिवसांत जिंकली. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. दीड तासांत या दोघांनी ९ विकेट्स घेत कांगारूंचा दुसरा डाव ११३ धावांवर गुंडाळला. त्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहली यांनी चांगली फटकेबाजी करून भारताचा विजय पक्का केला आणि भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. या निकालासोबतच भारतीय संघ कसोटी क्रमवारीत नंबर वन झाला. वन डे, ट्वेंटी-२० व कसोटी एकाच वेळी नंबर वन होणारा हा आशियातील पहिलाच संघ ठरला.
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीतील दुसरा दिवस विराट कोहलीला वादग्रस्त बाद दिल्याने गाजला. चेंडू बॅट अन् पॅडला एकाच वेळी आदळूनही अम्पायरने त्याला पायचीत दिले. नियमानुसार फलंदाजाला बेनिफिट ऑफ डाऊट मिळायला हवा होता, परंतु तसे नाही झाले. या निर्णयानंतर विराटच नव्हे तर टीम स्टाफची वैतागला होता. ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर विराटने त्याच्या विकेटची रिप्ले पाहिला आणि तोही संतापला. याच विषयावर कोहली मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडशी चर्चा करत होता. त्याच वेळी एक व्यक्ती विराटजवळ आली अन् त्याचा मूड बदलला. हे पाहून द्रविडलाही हसू आवरेनासे झाले.
सदर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर राहुल द्रविडने भाष्य केलं आहे. राहुल द्रविडने सांगितले की कोहलीने ड्रेसिंग रूममध्ये छोले भटुरेची ऑर्डर दिली होती. ते आल्यानंतर विराट कोहली खूप आनंदी झाला. छोले भटुरे हे दिल्लीतील प्रसिद्ध स्ट्रीट फूडपैकी एक आहे. विराट कोहलीने राहुल द्रविडला छोले भटुरे बोलावले होते. मात्र मी त्यास नकार दिला, अशी माहिती राहुल द्रविडने माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान, दिल्लीतील लोकांना छोटे भटुरे प्रचंड आवडतात आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला हा भटुरे किती आवडतो हे त्याच्या जुन्या मुलाखतीत पाहिले आहे. कोहलीने जगातील प्रत्येक आवडता पदार्थ खाल्ला आहे, पण दिल्लीतील राम के छोले भटुरे अजूनही त्याचा आवडता पदार्थ आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. भारतीय फलंदाज राहुल द्रविडशी गंभीर चर्चा करतोय. आणि या दरम्यान एक व्यक्ति काहीतरी पार्सल घेऊन येतो. ते पार्सल पाहताच विराटने टाळ्या वाजवल्या आणि खूप आनंदी होतो.