Join us  

Rahul Dravid on Team India: "आताचे सिनियर खेळाडू आधी लहानच होते, तेव्हा त्यांनीही संधीची वाट पाहिली"

संघातील आता जे सिनियर खेळाडू आहेत, त्यांनी कारकिर्दीच्या सुरूवातीला भरपूर धावा केल्या आणि आपल्या संघातील संधीसाठी वाट पाहिली, असंही द्रविड म्हणाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2022 10:16 AM

Open in App

भारतीय कसोटी संघात सध्या प्रचंड स्पर्धा आहे. काही ठराविक खेळाडू सोडल्यास इतर जागांसाठी अटीतटीची शर्यत रंगताना दिसत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे दोघे फारशी चांगली कामगिरी करताना दिसले नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागी हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर यांना संघात स्थान दिलं जायला हवं असा सूर सोशल मीडियावर दिसून आला. मात्र, या दोघांना कसोटी संघात सातत्याने स्थान मिळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागेल, असे संकेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने दिले.

श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरूद्ध घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी मालिकेत दमदार खेळला. श्रेयस अय्यरने दोन तीन सामन्यांपूर्वीच चांगली कामगिरी केली. त्याला दिलेली कामगिरी त्याने चोख पार पाडली. त्याने त्याला मिळालेली संधी योग्य प्रकारे वापरली यात काहीच वाद नाही, त्यामुळे आता त्यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा संघात स्थान दिलं जाईल. पण सध्या तरी त्यांनी सातत्याने चांगली कामगिरी करत राहायला हवी. तसं झाल्यास त्यांना लवकरच संघात कायमस्वरूपी स्थान मिळेल, असं द्रविड श्रेयस अय्यरबाबत म्हणाला.

हनुमा विहारीबाबतही द्रविडने स्पष्टपणे मत मांडलं. आताच्या घडीला भारतीय कसोटी संघात जे खेळाडू आहेत, ते अनुभवाच्या बळावर सिनियर खेळाडू म्हणून संघात आहेत. त्यांना हल्ली सिनियर खेळाडू म्हटलं जाऊ लागलं आहे. पण त्यांच्यावेळी त्यांनीदेखील त्यांच्या संधीची वाट पाहिली. त्यांनादेखील त्यांच्या कारकिर्दीच्या सुरूवातीला खूप धावा करावा लागल्या. त्यामुळे नंतर त्यांना संघात स्थान मिळालं आणि त्यांनी आपली जागा पक्की केली. कसोटी क्रिकेटमध्ये वाट पाहायला लागणं हा स्थायी भाव आहे. विहारीने ऑस्ट्रेलियामध्ये आणि आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये खेळपट्टीवर टिकून फलंदाजी केली. त्याबद्दल त्याचं अभिनंदनच केलं पाहिजे. पण त्यालाही त्याची संधी मिळण्यासाठी वाट पाहावीच लागेल, असंही द्रविडने स्पष्ट केले.  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाराहुल द्रविडश्रेयस अय्यरअजिंक्य रहाणे
Open in App