भारताचा माजी वर्ल्ड चॅम्पियन कोच आणि दिग्गज क्रिकेटर राहुल द्रविडच्या लेकाची टीम इंडियात वर्णी लागली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वेगवेगळ्या क्रिकेट प्रकारातील वेळापत्रकासह भारतीय अंडर १९ संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या अंडर १९ संघात द्रविडचा मुलगा समित द्रविड याचीही वर्णी लागली आहे. समित याला वनडेसह चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातूनच पदार्पणासाठी सज्ज झाला आहे.
या टी-२० स्पर्धेतून समितनं केली होती वरिष्ठ संघात एन्ट्री
भारत आणि ऑस्ट्रेलिया अंडर १९ संघामध्ये होणारी मालिका २१ सप्टेंबरपासून रंगणार आहे. या मालिकेत ३ वनडे सामन्यासह २ चार दिवसीय सामन्यांचा समावेश आहे. समित द्रविड नुकताच कर्नाटकमधील महाराजा पुरुष टी-२० स्पर्धेत खेळताना दिसला होता. वरिष्ठ स्तरावरील ही त्याची पहिली स्पर्धा होती. तो म्हैसूर वॉरियर्स संघाचा भाग होता. मध्यम फळीत फलंदाजी करणाऱ्या समितनं या स्पर्धेतील ७ डावात ११४ च्या स्ट्राइक रेटनं आतापर्यंत ८२ धावा केल्या होत्या. त्याचा संघ या स्पर्धेतील सेमीफायलमपर्यंतही पोहचला आहे.
कधी अन् कुठं रंगणार भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका?
१९ वर्षाखालील भारतीय संघ २१, २३ आणि २६ सप्टेंबरला पुडुचेरीच्या मैदानात ऑस्ट्रेलियन अंडर १९ संघाविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर ३० सप्टेंबर आणि ७ ऑक्टोबरला या दोन्ही संघात २ दिवसीय सामने नियोजित आहेत.
वनडे मालिकेसाठी भारतीय अंडर १९ संघ :
रुद्र पटेल (उप कर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी (केएससीए), मोहम्मद अमान (कर्णधार) , किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (विकेट किपर बॅटर), हरवंश सिंह पंगालिया (विकेट किपर बॅटर) , समित द्रविड, युद्धजीत गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज (केएससीए), रोहित राज अवत,, मोहम्मद एनान.
चार दिवशीय मालिकेसाठी भारताचा अंडर १९ संघ
वैभव सूर्यवंशी, नित्या पांड्या, विहान मल्होत्रा (उप कर्णधार), सोहम पटवर्धन (कर्णधार), कार्तिकेय केपी , समित द्रविड, अभिज्ञान कुंडू (विकेट किपर बॅटर), हरवंश सिंह पंगालिया (विकेट किपर बॅटर), चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंह, आदित्य सिंह, मोहम्मद एनान.