Rahul Dravid son Samit, Cricket Team: पुढील महिन्यापासून भारतीय संघ वन डे विश्वचषक खेळणार आहे. त्याआधी संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा संघ ऑस्ट्रेलियासोबत एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेच्या मध्यावरच राहुल द्रविडसाठी आनंदाची बातमी आली आहे. या बातमीचा संबंध भारतीय संघाशी नसून राहुल द्रविडच्या कुटुंबाशी आहे. दिग्गज फलंदाज राहुल द्रविडचा मुलगाही क्रिकेटच्या मैदानात उतरला आहे. विनू मांकड ट्रॉफीसाठी कर्नाटकच्या अंडर-19 संघात समित द्रविडची निवड झाली आहे.
विनू मांकडे स्पर्धा 19 वर्षांखालील स्पर्धा 12 ते 20 ऑक्टोबर दरम्यान हैदराबाद येथे होणार आहे. कर्नाटक संघाचा कर्णधार धीरज जे. गौडा असेल तर ध्रुव प्रभाकर उपकर्णधार असणार आहे. 18 वर्षीय समित या आधी अंडर 14 स्पर्धेत कर्नाटककडून खेळला आहे. पण अंडर-19 स्तरावर तो खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. समित हा देखील वडिलांप्रमाणेच उजव्या हाताने फलंदाजी करतो. 2019 मध्ये समितने कर्नाटक इंटर झोन स्पर्धेत द्विशतकही झळकावले होते. त्यामुळे समित या स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.
विशेष म्हणजे, द्रविडही कर्नाटककडून अंडर-19 खेळला आहे. राहुल द्रविड वरिष्ठ स्तरावर खेळण्यापूर्वी अंडर-15, अंडर-17 आणि अंडर-19 मध्ये राज्य स्तरावर खेळला होता. त्यानंतर 1991/92 च्या मोसमात राहुल द्रविडला रणजी ट्रॉफी खेळण्याची संधी मिळाली होती.
Web Title: Rahul Dravid son Samit named in Karnataka squad for Vinoo Mankad Trophy under 19 team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.