राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी पाठींबा दिल्यानंतर आता वेगळेच वळण घेतले आहे. बाहेरच्या व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खूपसू नये असा पलटवार देशातील अनेक सेलिब्रेटींनी केली. त्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याच्यापासून ते गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही सरकारच्या समर्थनात ट्विट केलं आहे. पण, सचिननं केलेलं ट्विटवर समिंश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सचिनच्या #IndiaAgainstPropoganda ट्विटनंतर सोशल मीडियावर माजी कसोटीपटू राहुल द्रविड ( Rahul Dravid) ट्रेंड होऊ लागला आहे. Farmer Protest: सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर अन् विराट कोहलीनं केलं सरकारच्या समर्थनार्थ ट्विट
आंतरराष्ट्रीय गायिका रिहानानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस, पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केले. या सर्वांना उत्तर म्हणून देशातील अनेक सेलिब्रेटिंनी ट्विट केले. सोशल मीडियावर जणू ट्विटरवॉर सुरू झाला आहे. ''भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. भारतात जे काही घडत आहे, बाह्य शक्ती त्याचे प्रेक्षक होऊ शकतात परंतु सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि त्यांनीच निर्णय घ्यावा, चला एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया,'' असं आवाहन सचिन तेंडुलकरने ट्विटमधून केले आहे.