अपयशामुळे निराश झालेला विराट कोहली; राहुल द्रविडनं जे केलं, त्यानं जिंकली मनं, Video Viral

विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध ९ धावा केल्या आणि त्याला स्पर्धेतील सात डावांमध्ये ७५ धावाच करता आल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 04:26 PM2024-06-28T16:26:06+5:302024-06-28T16:26:35+5:30

whatsapp join usJoin us
Rahul dravid went to Virat Kohli as he was looking broken after that dismissal, Video | अपयशामुळे निराश झालेला विराट कोहली; राहुल द्रविडनं जे केलं, त्यानं जिंकली मनं, Video Viral

अपयशामुळे निराश झालेला विराट कोहली; राहुल द्रविडनं जे केलं, त्यानं जिंकली मनं, Video Viral

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील गयाना येथे इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli) पुन्हा अपयशी ठरला. या वर्ल्ड कपमध्ये विराट पाचव्यांदा एक अंकी धावसंख्येवर बाद झाला. कोहलीने इंग्लंडविरुद्ध ९ धावा केल्या आणि त्याला स्पर्धेतील सात डावांमध्ये ७५ धावाच करता आल्या आहेत. बाद झाल्यानंतर कोहली निराश बसला होता आणि त्यावेळी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हा त्याच्याजवळ गेला अन् त्याने कोहलीचे सांत्वन केले.  


कोहली व्हिडिओमध्ये जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्यासोबत बसलेला दिसत आहे. अक्षर पटेल ( Axar Patel) आणि कुलदीप यादव यांनी इंग्लंडला गुडघे टेकायला लावले. रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांच्यासह फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने १७१ धावा उभ्या केल्या. फिरकीला साथ देणाऱ्या संथ खेळपट्टीवर पटेलने ( ३-२३) इंग्लंडला पूर्णपणे बॅकफूटवर फेकले. त्यानंतर कुलदीप यादवने ( ३-१९) कमाल करताना भारताचा विजय पक्का केला.  इंग्लंडचा डाव १०३ धावांवर गुंडाळला आणि २०२२च्या उपांत्य फेरीत इंग्लंडने केलेल्या पराभवाचा भारताने वचपा काढला. टीम इंडिया जेतेपदाच्या लढतीत २९ जूनला दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. 


तत्पूर्वी, विराट कोहली ( ९) व रिषभ पंत ( ४) यांना अपयश आले. पावसाच्या लपंडावात रोहित शर्मा ( ५७) व सूर्यकुमार यादव ( ४७) यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना धुऊन काढले. रोहित ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या नॉक आऊट सामन्यात अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. सूर्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले, परंतु रोहितसह त्याने जोडलेल्या ७३ धावा इंग्लंडची डोकेदुखी वाढवणाऱ्या ठरल्या. हार्दिक पांड्याने २३ धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. रवींद्र जडेजाच्या नाबाद १७ धावा व अक्षर पटेलच्या १० धावांन भारताला ७ बाद १७१ धावांपर्यंत पोहोचवले. खेळपट्टी पाहता या मॅच विनिंग धावा आहेत. इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनने ३ विकेट्स घेतल्या. 
 

Web Title: Rahul dravid went to Virat Kohli as he was looking broken after that dismissal, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.