Join us  

सोमवारपासून राहुल द्रविड देणार भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये रविवारी विश्वचषकाचा सामना रंगणार आहे. त्यानंतर द्रविड हे आपला पदभार स्वीकारणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 9:13 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय ज्युनिअर संघाचे प्रशिक्षक आणि भारताचे माजी महान क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्यावर आता मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता सोमवारपासून द्रविड हे भारताच्या खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत. त्यामुळे आता द्रविड यांच्याकडे भारताच्या ज्युनिअर संघाचे प्रशिक्षकपद नसेल. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये रविवारी विश्वचषकाचा सामना रंगणार आहे. त्यानंतर द्रविड हे आपला पदभार स्वीकारणार आहेत. 

द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 19-वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. मुंबईचा पृथ्वा शॉ हा या संघाचा कर्णधार होता. द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनिअर संघ चांगली कामगिरी करत होता. पण आता द्रविड यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील निर्णयाक सामना उद्या होणार आहे. या सामन्यातील विजयामुळे दोन्ही संघांचे भविष्य बदलू शकते. कारण इंग्लंडने जर हा सामना गमावा तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. दुसरीकडे हा सामना जिंकून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी भारताचा संघ उत्सुक असेल.

सध्याच्या घडीला भारत हा गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने सामना सामन्यांमध्ये पाच सामने जिंकले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे भारताला एका गुणावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे भारताचे सध्याच्या घडीला 11 गुण आहेत. त्यामुळे हा सामना जर भारताने जिंकला तर 13 गुणांसह ते उपांत्य फेरी गाठू शकतात.

भारतीय खेळाडूंसाठी चांगली कामगिरी करणे महत्वाचे असते. त्याबरोबर त्यांना दुखापतीतून फिट बनवणे, त्यांचे पुनर्वसन करणे ही गोष्ट देखील महत्वाची असते. त्याचबरोबर त्यांच्याकडून काही तांत्रिक गोष्टी घोटवून घेणे, हेदेखील महत्वाचे असते. त्यामुळे ही जबाबदारी आता द्रविड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

बीसीसीआयने द्रविड यांच्याबरोबर दोन वर्षांचा करार केला आहे. आता द्रविड हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख असतील. द्रविड यांच्याबरोबर पारस म्हाम्ब्रे आणि अभय शर्मा हेदेखील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सहाय्यक प्रशिक्षकाचे काम पाहतील.

टॅग्स :राहूल द्रविडबीसीसीआय