Join us  

Shikhar Dhawan T20 career is over? राहुल द्रविडमुळे टीम इंडियाच्या 'गब्बर'ची कारकीर्द संपुष्टात?; आयर्लंडविरुद्धही संधी नाही मिळाली

India’s squad for T20I series against Ireland : २६ व २८ जून या कालावधीत होणाऱ्या आयर्लंड-भारत ( Ireland vs India) ट्वेंटी-२० सामन्यांसाठी BCCI ने हा संघ जाहीर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 12:30 PM

Open in App

India’s squad for T20I series against Ireland : BCCI ने बुधवारी आगामी आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. २६ व २८ जून या कालावधीत होणाऱ्या आयर्लंड-भारत ( Ireland vs India) ट्वेंटी-२० सामन्यांसाठी BCCI ने हा संघ जाहीर केला. आयपीएल २०२२मध्ये नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्सला पहिल्याच प्रयत्नात जेतेपद पटकावून देणाऱ्या हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयपीएल गाजवणाऱ्या राहुल त्रिपाठीला ( Rahul Tripathi) पदार्पणाची संधी दिलीय, तर संजू सॅमसनचे पुनरागमन झाले आहे. दरम्यान, या दौऱ्यातही शिखर धवनचे ( Shikhar Dhawan) नाव संघात नसल्याचे त्याची ट्वेंटी-२० कारकीर्द संपल्यात जमा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघ निवडण्यापूर्वी सीनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखऱ धवनकडे नेतृत्व सोपवलं जाईल, अशी चर्चा होती. पण, प्रत्यक्षात गब्बरला संघातच समावेश केला गेला नाही. त्यावेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यांनी स्वतः फोन करून धवनला ट्वेंटी-२०साठी त्याचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे द्रविडच्या त्या फोन कॉलमुळे धवनची ट्वेंटी-२० कारकीर्द संपुष्टात आल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले होते. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघात प्रयोग होताना दिसत आहेत.

धवनने आयपीएल २०२२त पंजाब किंग्सचे प्रतिनिधित्व करताना १४ सामन्यांत ३८ च्या सरासरीने ४६० धावा केल्या होत्या. २०१६ पासून तो आयपीएलच्या प्रत्येक पर्वात ४०० पेक्षा अधिक धावा करतोय. तरीही त्याला भारताच्या ट्वेंटी-२० संघात स्थान  न मिळाल्याने त्याचे चाहते नाराज आहेत. रोहित शर्मा व विराट कोहली यांनाही आयपीएलमध्ये इतकी सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. 

आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ - हार्दिक पांड्या ( कर्णधार), भुवनेश्वर कुमार( उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सुर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्षदीप सिंग, उमरान मलिक. 

टॅग्स :राहुल द्रविडशिखर धवनभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयआयर्लंड
Open in App