नवी दिल्ली - 'द वॉल' राहुल द्रविड आणि त्याची खिलाडूवृत्ती जगजाहीर आहे. त्याची खेळाप्रति असलेल्या निष्ठेचे सर्वजण चाहते आहेत. विश्वविजेत्या भारतीय अंडर 19 संघाचा कोच असलेल्या राहुल द्रविडने विजयानंतर ''मला, माझ्या संघाला आणि सपोर्ट स्टाफला देण्यात आलेल्या रोख बक्षिसात इतकं अंतर कशासाठी ठेवण्यात आलं आहे ? '' असा सवाल बीसीसीआला करत नाराजी व्यक्त केली होती. बीसीसीआयनं यावर विचार करत सपोर्ट स्टाफला देण्यात येणाऱ्या बक्षिसांमध्ये वाढ केली आहे.
वर्तमान सपोर्ट स्टाफ आणि विश्वविजयाच्या एक वर्ष आधी संघासोबत असेल्या सपोर्ट स्टाफला बीसीसीआयनं बक्षिस देण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल द्रविड आणि त्या सर्व सपोर्ट स्टाफला आता प्रत्येकी 25 लाख रुपये देण्यात येणार आहे. यापूर्वी द्रविडला 50 लाख रुपये देण्यात येणार होते. बीसीसीआयने द्रविडने केलेल्या मागणीनुसार प्रत्येकाला एकसारखी रक्कम देण्याचा निर्णय घेतला. पण यामुळं द्रविडला 25 लाख रुपयांचे नुकसान झालं आहे. द्रविडनं आपल्याला होणाऱ्या या नुकसानाची पर्वा न करता सर्वांना समान संधी देण्याची मागणी केली होती.
काय म्हणाला होता द्रविड - विश्वचषक जिंकण्याचा मोलाचा वाटा उचलणारा प्रशिक्षक राहुल द्रविड मात्र नाराज दिसत होता. राहुल द्रविडने बीसीसीआयला विचारणा केली होती की, 'वर्ल्डकप जिंकल्यानंतर देण्यात आलेल्या बक्षिसाच्या रकमेत इतकं अंतर कशासाठी ?'. मला, माझ्या संघाला आणि सपोर्ट स्टाफला देण्यात आलेल्या रोख बक्षिसात इतकं अंतर कशासाठी ठेवण्यात आलं आहे ?. बीसीसीआयने प्रशिक्षक राहुल द्रविडला 50 लाख, सपोर्ट स्टाफला 20-20 लाख आणि संघातील खेळाडूंना 30-30 लाखांचं बक्षिस जाहीर केलं होतं. इतर कोचिंग स्टाफच्या तुलनेत मोठी रक्कम देण्यावर राहुल द्रविडने आक्षेप नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल द्रविडने संपुर्ण कोचिंग स्टाफला एकसमान रक्कम दिली गेली पाहिजे असं आवाहन बीसीसीआयला केलं होतं. सोबतच स्टाफमध्ये मतभेद केला जाऊ नये असंही म्हटलं होते. राहुल द्रविडने बोर्डाला स्पष्ट शब्दांत सांगितलं होते की, 'स्टाफने एका टीमप्रमाणे काम केलं आहे, ज्याचा परिणाम आपण वर्ल्डकप जिंकण्यात यशस्वी झालो. यामुळे प्रत्येकाला समान बक्षिस मिळालं पाहिजे'.
Web Title: rahul-dravids-prize-money-for-u-19-world-cup-win-reduced-to-rs-25-lakh-following-his-request
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.