नवी दिल्ली: शांत, संयमी, संस्कारी अशी राहुल द्रविडची ( Rahul Dravid) प्रतिमा.. पण, काही महिन्यांपूर्वी एका जाहिरातीत राहुल द्रविडचा स्वभावाच्या परस्परविरोधी रूप सर्वांनी पाहिले... मात्र, तो 'इंदिरानगरचा गुंडा'ही सर्वांना आवडला. त्या जाहिरातीत द्रविडला कचाकचा भांडताना, बॅटीने इतरांच्या गाडीच्या काचा तोडताना दाखवला गेला आहे. त्याचा तो व्हिडीओ लाखोंनी व्हायरल झाला. सोशल मीडियापासून लांब राहणाऱ्या द्रविडने Reels च्या दुनियेत पदार्पण केले आहे आणि त्याचा सध्या व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. शिखर धवनचेसोशल मीडियावर अनेक रिल्स आहेत, परंतु त्याने नव्या रिल्समध्ये द्रविडला भाग घेण्यास राजी केले आणि तो व्हिडीओ धुमाकूळ घालतोय... चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स या आयपीएल संघांनीही त्यावरून तुफान फटकेबाजी केलीय.
राहुल द्रविडचा अनोखा स्वॅग
भारतीय संघ सध्या वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर आहे. वेस्टइंडिजला रवाना होण्यापूर्वी संघाने रोहितच्या नेतृत्वात इंग्लिश संघाला तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-१ ने चितपट केले. मात्र आता रोहित शर्माच्या गैरहजेरीत संघाची कमान सांभाळणाऱ्या शिखर धवनने सोशल मीडियावर एक रिल शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये शिखर धवन, श्रेयस अय्यर, ईशान किशन, युजवेंद्र चहल, शुभमन गिल, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. मात्र सर्वात शेवटी करणाऱ्या राहुल द्रविडने सर्वांचेच लक्ष वेधले. नेहमी शांत असणाऱ्या प्रशिक्षकाचा हा स्वॅग पाहून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
भारत विरूद्ध वेस्टइंडिज एकदिवसीय मालिका
२२ जुलै, पहिला सामना, त्रिनिदाद२४ जुलै, दुसरा सामना, त्रिनिदाद२७ जुलै, तिसरा सामना, त्रिनिदाद
(वरील सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजल्यापासून सुरू होतील)
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, रविंद्र जडेजा (उपकर्णधार), अक्षर पटेल, ईशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.