Join us  

धावसंख्येला आकार देण्याची कला शिकलोय - राहुल

‘परिस्थितीनुसार धावा कशा काढायच्या, शिवाय धावसंख्येला आकार कसा द्यायचा याची कला आता चांगलीच अवगत झाली,’ असे मत भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याने व्यक्त केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 3:52 AM

Open in App

इंदूर: ‘परिस्थितीनुसार धावा कशा काढायच्या, शिवाय धावसंख्येला आकार कसा द्यायचा याची कला आता चांगलीच अवगत झाली,’ असे मत भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याने व्यक्त केले. सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच एकदिवसीय सामन्यात चांगला खेळ होत असल्याचे राहुलचे मत आहे. २०१९ मध्ये राहुलने मर्यादित षटकांच्या सामन्यात दमदार कामगिरी केली. त्याने तीन शतके आणि तीन अर्धशतके ठोकली. टी२० तही त्याने तीन अर्धशतके ठोकली आहेत. लंकेविरुद्ध विजय मिळविल्यानंतर राहुल म्हणाला, ‘मी धावा काढत आहे, शिवाय खेळी कशी उभारायची हेही शिकलोय. माझ्यात धावा काढण्याची क्षमता असल्याचे माहीत होते. क्रिझवर काही वेळ घालवावाच लागेल, हे ओळखून मी खेळलो.’