Rahul Tripathi Hardik Pandya, IPL 2022 KKR vs SRH: राहुल त्रिपाठीने केली कोलकाताची धुलाई; हार्दिक पांड्याला टाकले मागे

राहुल त्रिपाठीला मिळाला सामनावीराचा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 01:01 AM2022-04-16T01:01:46+5:302022-04-16T01:04:00+5:30

whatsapp join usJoin us
Rahul Tripathi overtakes Hardik Pandya in IPL records by playing match winning knock in IPL 2022 KKR vs SRH | Rahul Tripathi Hardik Pandya, IPL 2022 KKR vs SRH: राहुल त्रिपाठीने केली कोलकाताची धुलाई; हार्दिक पांड्याला टाकले मागे

Rahul Tripathi Hardik Pandya, IPL 2022 KKR vs SRH: राहुल त्रिपाठीने केली कोलकाताची धुलाई; हार्दिक पांड्याला टाकले मागे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rahul Tripathi Aiden Markram, IPL 2022 SRH vs KKR Live Updates: सनराझयर्स हैदराबादने ७ गडी राखून कोलकातावर दणदणीत विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सचा नितीश राणा आणि आंद्रे रसल यांनी तुफान फटकेबाजी करत संघाला १७५ धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करत असताना राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादने कोलकातावर मोठा विजय मिळवला. राहुल त्रिपाठीने सर्वाधिक ७१ धावांची खेळी करत विक्रमी खेळी केली. त्याने हार्दिक पांड्याला मागे टाकले.

१७६ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचे सलामीवीर अभिषेक शर्मा (३) आणि केन विल्यमसन (१७) पॉवरप्ले मध्येच बाद झाले. पण तिसऱ्या विकेटसाठी राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम जोडीने ९४ धावांची भागीदारी केली. राहुल त्रिपाठीने तुफान फटकेबाजी केली. त्याने ४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ३७ चेंडूत ७१ धावा कुटल्या. राहुलने या सामन्यात IPL कारकिर्दीतील सातवे अर्धशतक झळकावले. त्याने सहा IPL अर्धशतके ठोकलेल्या हार्दिक पांड्याला मागे टाकत नवा पराक्रम केला.

दरम्यान, त्याआधी प्रथम फलंदाजी करताना आरोन फिंच ७ धावांवर बाद झाला. व्यंकटेश अय्यर (६) आणि सुनील नरिन (६) एकाच षटकात माघारी परतले. श्रेयस अय्यरही २८ धावांवर तंबूत परतला. नितीश राणाने ३६ चेंडूत ५४ धावा केल्या. तर आंद्रे रसलने ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने २४ चेंडूत नाबाद ४९ धावा कुटल्या.

Web Title: Rahul Tripathi overtakes Hardik Pandya in IPL records by playing match winning knock in IPL 2022 KKR vs SRH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.