Join us  

निर्णायक सामन्यावर पाऊस?; इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजयाची वेस्ट इंडिजला संधी

तिसरी कसोटी आजपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 10:53 PM

Open in App

मॅन्चेस्टर : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज शुक्रवारपासून तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना खेळला जाणार आहे. उभय संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकल्यानंतर मालिकेचा निकाल ठरवणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट घोंगावत आहे. ओल्ड ट्रॅफोर्डवर पावसाचीच भूमिका निर्णायक ठरेल, असे दिसते. याआधी दोन्ही सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. येथेही खराब हवामान आणि पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विंडीजकडे ३२ वर्षानंतर इंग्लंडमध्ये मालिका विजयाची संधी असेल. याआधी १९८८ साली विंडीजने इंग्लंडला त्यांच्या भूमीत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ४-० अशी धूळ चारली होती. सध्याच्या मालिकेत साऊथम्पटनचा पहिला सामना विंडीजने चार गडी राखून जिंकल्यानंतर दुसºया सामन्यात इंग्लंडने ११३ धावांनी मुसंडी मारली. त्यामुळे आता दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची संधी आहे. विस्डेन चषक विंडीजला स्वत:कडे ठेवायचा झाल्यास सामना किमान अनिर्र्णित राखावा लागेल. कोरोना संकटात जैव सुरक्षा वातावरणात ही मालिका खेळवली जात असल्याने जय-पराजयाला महत्त्व दिले जाऊ नये.

दुसरीकडे मालिका जिंकणारा संघ आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पुढे जाईल, हेदेखील वास्तव आहे. मालिका आयोजनासाठी मात्र दोन्ही बोर्डाचे पदाधिकारी आणि प्रत्यक्ष मैदानावर खेळणाºया खेळाडूंचे कौतुक करावे तितके थोेडे ठरावे. दोन्ही सामन्यात उभय संघातील खेळाडूंनी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन केले.

अपवाद होता, तो वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा. २५ वर्षांचा हा वेगवान गोलंदाज पहिल्या सामन्यानंतर मैत्रिणीला भेटायला घरी गेला होता. नियमांचा भंग केल्यावरून त्याला दुसºया कसोटीस मुकावे लागले. दंड झाला तो वेगळा. ओल्ड ट्रॅफोर्डची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना पूरक करण्याची शक्यता असल्याने वेस्ट इंडिज संघ वेगवान शॅनन गॅब्रियलएवेजी फिरकीपटू राहकिम कॉर्नवाल याला संधी देऊ शकतो. (वृत्तसंस्था)

उभय संघ

इंग्लंड : रोरी बर्न्स, डोमिनिक सिब्ले, झॅक क्राऊले, ज्यो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर, डोमिनिक बेस, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अ‍ॅन्डरसन.

वेस्ट इंडिज : क्रेग ब्रेथवेट, जॉन कॅम्पबेल, शाय होप, जोशुआ सिल्व्हा, शामराह ब्रूक्स, रोस्टन चेस जमेन ब्लॅकवूड, शॅनन डाऊरिच, जेसन होल्डर (कर्णधार), अल्जारी जोसेफ, केमार रोच शॅनन गॅब्रियल आणि राहकिम कॉर्नवाल.

आर्चरचे खेळणे अनिश्चित

पाच दिवसांच्या विलगीकरणातून बाहेर आलेल्या आर्चरचा संघात तर समावेश झाला मात्र वर्णद्वेषी शिवीगाळ झाल्याचा या खेळाडूने खुलासा करताच नव्या वादाला तोंड फुटले आहे. आर्चरने बोर्डाकडे रीतसर तक्रारदेखील केली. तो स्वत:ला मानसिकदृष्ट्या खचलेला मानत असल्याने तिसºया सामन्यात खेळू शकेल, याची शक्यता कमीच आहे.

टॅग्स :इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज