IPL 2024, RCB vs CSK : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना नॉक आऊट सामना असणार आहे. CSK १३ सामन्यांत ७ विजय मिळवून १४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर RCB १३ सामन्यांत १२ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. या दोन्ही संघांसाठी १८ मे रोजी होणारा RCB vs CSK सामना हा नॉक आऊट असेल. आयपीएल २०२४ च्या लीग स्टेजचा शेवटचा टप्पा अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला आहे. मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या मार्गावर आहे.
चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये दोन स्थानांसाठी चुरशीची लढत होत आहे. दिल्लीसाठी हा मार्ग खूप अवघड आहे, त्यामुळे लखनौला आपले उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक झाले आहे. चेन्नई आणि हैदराबादला प्रत्येकी एक विजय आवश्यक आहे, तर बंगळुरूला चेन्नईला पराभूत करण्याची गरज आहे. चेन्नई आणि बंगळुरू यांच्यातील सामना दोघांचे भवितव्य ठरवेल. म्हणजेच हा सामना एक प्रकारे बाद फेरीचाच असेल. चेन्नईने विजय मिळवला तर तो प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी RCBला चेन्नईला मोठ्या फरकाने पराभूत करणे आवश्यक आहे.
या दोघांमधील हाय व्होल्टेज सामना १८ मे रोजी बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे, परंतु हवामान खात्याने मंगळवारी दिलेली माहिती RCBच्या चाहत्यांसाठी चिंता वाढवणार आहे. हवामान खात्यानुसार, बंगळुरूमध्ये १४ ते १९ मे दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुसळधार पावसासह वादळाचीही शक्यता आहे. अशा स्थितीत बंगळुरू आणि चेन्नई यांच्यातला सामना धोक्यात आला आहे. हा सामना न झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिले जातील. त्यानंतर चेन्नईचे १५ गुण होतील, तर बंगळुरूचे १३ गुण राहतील. त्यामुळे RCB चे आव्हान संपुष्टात येईल.
Web Title: Rain might play spoilsport in the much-awaited RCB vs CSK showdown in Bengaluru, who going to play off if match washed out
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.