ख्राईस्टचर्च : प्रत्येकी तीन सामन्यांची टी-२० आणि वन-डे मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आलेल्या युवा भारतीय संघाला खराब हवामानामुळे सतत निराशा पत्करावी लागली. बुधवारी होणाऱ्या अखेरच्या सामन्यावरदेखील पावसाचे सावट आहे. पहिला सामना गमावल्याने मालिकेत ०-१ ने मागे पडलेल्या भारताला मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी विजयाची गरज असेल. त्यासाठी पावसाने व्यत्यय आणू नये, अशी प्रार्थना करावी लागेल. पाचपैकी एक वन-डे आणि एक टी-२० लढत होऊ शकली नाही. एक टी-२० सामना पावसामुळे डकवर्थ- लुईस नियमानुसार ‘टाय’ झाला. शिखर धवनच्या संघाला मालिका गमवायची नसल्याने अखेरचा सामना खेळून विजय मिळवावा लागेल. हेगले ओव्हलचे मैदान पारंपरिकदृष्ट्या वेगवान गोलंदाजांना पूरक राहिले. येथे मागील काही वर्षांत सरासरी २३० धावा निघाल्या.
भारतीय संघ सुरुवातीच्या दहा षटकात (पॉवर प्ले) धावा काढण्यात माघारला. सलामीला खेळणाऱ्या शिखरला याची जाणीव असून पुढच्या वर्षी आयोजित वन-डे विश्वचषक संघात स्थान टिकविण्यासाठी त्याला स्वत:च्या खेळात सुधारणा करावी लागणार आहे. शुभमनने येथे दोन सामन्यांत ५० आणि नाबाद ४५ धावा काढल्या, तर तुफानी खेळी करणाऱ्या सूर्याने सेडन पार्कवरील १२.५ षटकांच्या खेळात तीन षटकार मारले. येथेही मोठी धावसंख्या उभारायची झाल्यास सूर्या-ऋषभ पंत यांना जबाबदार खेळी करावीच लागेल. पंत इंग्लंड दौऱ्यानंतर ‘फ्लॉप ’ ठरत आहे. तरीही तो संघात असेल तर संजू सॅमसनला पुन्हा एकदा बाहेर बसावे लागेल. मागच्या सामन्यात दीपक हुड्डाला संधी मिळाली होती. युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरमुळे कुलदीप यादवलादेखील अद्याप संधी देण्यात आलेली नाही. भारताच्या वेगवान माऱ्याची जबाबदारी अर्शदीप सिंह, दीपक चाहर आणि उमरान मलिक यांच्यावर असेल. न्यूझीलंड संघातील मॅट हेन्री, टिम साउदी आणि लॉकी फर्ग्युसन यांच्याकडेदेखील भारतीय फलंदाजांच्या उणिवांचा लाभ घेण्याची चांगली संधी असेल.
भारत वि. न्यूझीलंडहेड टू हेडएकूण सामने : ११२भारत विजयी : ५५न्यूझीलंड विजयी : ५०टाय सामने : ०१अनिर्णित सामने : ०६
हेगले ओव्हलवर नाणेफेकीचा कौल