ठळक मुद्देया खेळीबरोबर रैनाने ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये 1452 धावा पूर्ण केल्या.
कोलंबो : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना हे दोघेही सख्खे मित्र. या दोघांच्या मैत्रीची उदाहरणं क्रिकेट विश्वाला दिली जातात. या दोघांमध्ये कसलीही स्पर्धा नाही, पण आकडेवारीचा विचार केला तर रैनाने एका बाबतीत धोनीला मागे टाकले आहे आणि त्याचीच चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.
श्रीलंकेमध्ये सध्या निदाहास ट्रॉफी ट्वेन्टी-20 स्पर्धा सुरु आहे. या मालिकेसाठी धोनीला विश्रांती देण्यात आली आहे, पण रैना मात्र या मालिकेत खेळत आहे. आतापर्यंत रैना हा धोनीपेक्षा 18 ट्वेन्टी-20 सामने कमी खेळला आहे. पण धावांच्या बाबतीत मात्र रैनाने धोनीला मागे टाकले आहे.
निदाहास ट्रॉफीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रैनाने 15 चेंडूंमध्ये 27 धावांची खेळी साकारली होती. ही 27 धावांची खेळी साकारताना रैनाने दोन चौकार आणि दोन षटकार लगावले होते. या खेळीमुळे रैना आता फॉर्मात आल्याचे काही जणांना वाटत आहे. या खेळीबरोबर रैनाने ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये 1452 धावा पूर्ण केल्या. यानुसार रैनाने धोनीला पिछाडीवर टाकले आहे, कारण धोनाच्या खात्यामध्ये 1444 धावा आहेत.
ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तीलच्या नावावर आहेत. त्याच्या खात्यामध्ये 2271 धावा आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावरही न्यूझीलंडचाच खेळाडू आहे. न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर 2140 धावा आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहलीचा या यादीमध्ये तिसरा क्रमांक लागतो. कोहलीच्या नावावर 1983 धावा आहेत.
Web Title: Raina scored more runs with less matches than Dhoni
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.