नवी दिल्ली : अनुभवी सुरेश रैनाने आज जवळपास अडीचपेक्षा जास्त वर्षांनंतर भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन केले आहे. त्याचा यो-यो टेस्टमध्ये फेल ठरणाऱ्या अंबाती रायुडू याच्या जागी इंग्लंड दौºयासाठी भारतीय वन-डे संघात समावेश करण्यात आला आहे.रायुडू फिटनेसच्या या नवीन मापदंडात पर्याप्त गुण प्राप्त करण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याला संघाबाहेर जावे लागले. राष्ट्रीय निवड समितीने आज त्याच्या जागेवर रैनाला संघात घेण्याचा निर्णय घेतला आहे.बीसीसीआयने म्हटले, की राष्ट्रीय निवड समितीने इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी भारतीय वन-डे संघात अंबाती रायुडूच्या जागेवर सुरेश रैनाचा समावेश केला आहे. रायुडू १५ जूनला एनसीए बंगळुरूत झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. रैनाने त्याचा अखेरचा वन-डे सामना २५ आॅक्टोबर २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मुंबईत खेळला होता. त्याला चांगला सूर गवसला होता. त्यामुळे त्याला आयपीएलआधी श्रीलंकेत झालेल्या टी-२० तिरंगी मालिकेसाठी निवडण्यात आले होते. रैनाने आतापर्यंत २२३ वन-डेत ५,५६८ धावा केल्या आहेत. त्यात पाच शतके आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलची चॅम्पियन टीम चेन्नई सुपरकिंग्जकडून ६०२ धावा फटकावणाºया रायुडूचे यो-यो टेस्टमध्ये अपयशी ठरणे आश्चर्यकारक मानले जात आहे. तो या टेस्टमध्ये पात्र ठरण्यासाठी १६.१ गुणांची आवश्यकता असताना तो १४ गुण प्राप्त करू शकला. भारत इंग्लंड दौºयात तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. पहिला सामना १२ जुलै रोजी नॉटिंगहॅम येथे खेळवला जाईल. इंग्लंड दौºयासाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, सुरेश रैना, एम. एस. धोनी (यष्टिरक्षक), दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल व उमेश यादव.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- रायुडूच्या जागेवर रैना भारतीय संघात
रायुडूच्या जागेवर रैना भारतीय संघात
अनुभवी सुरेश रैनाने आज जवळपास अडीचपेक्षा जास्त वर्षांनंतर भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन केले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 3:16 AM