नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सचे युवा खेळाडू इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या पर्वात छाप सोडण्यासाठी प्रयत्नशील आहेत.कार्तिक त्यागी, आकाश सिंग, यशस्वी जयस्वाल यांच्यासारखे भारताच्या अंडर-१९ संघाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू संघाने १२ वर्षांपूर्वी केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास सज्ज आहेत. त्यावेळी ‘रॉकस्टार रवींद्र जडेजा’ अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघाचा पहिली पसंती ठरला.
कार्तिकने रणजी ( उत्तर प्रदेश) संघाचा यापूर्वीचा कर्णधार सुरेश रैनाची प्रशंसा करताना म्हटले की, ‘सुरेश रैनाचे माझ्या कारकिर्दीत काय योगदान आहे, हे येथे मी विस्तारपूर्वक सांगू शकत नाही.’ आकाश सिंगसाठी ही देवाने दिलेली संधी आहे. येथे त्याला त्याचा आवडता जेडी भय्यासोबत (जयदेव उनाडकट) मैदानावर वेळ घालविण्याची संधी मिळू शकते. अडचणीच्या स्थितीला कसे सामोरे जायचे याची शिकवण त्याला येथे मिळण्याची संधी राहील.
१९ वर्षांखालील संघाचा त्यांचा आणखी एक सहकारी यशस्वीला पूर्वीपासून भारतीय संघाचे भविष्य मानले जात आहे. मुंबईचा हा खेळाडू लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी करणारा सर्वांत युवा खेळाडू आहे. त्यागीने त्या क्षणाची आठवण केली ज्यावेळी रैनाने १७ व्या वर्षी त्याला रणजी संघात सामील करण्यास पाठिंबा दिला होता आणि वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारने त्याचे समर्थन केले होते. वेगवान गोलंदाज म्हणाला, ‘रैनाचे योगदान आम्ही कधीच विसरू शकत नाही. ज्यावेळी मी अंडर-१६ खेळलो होतो त्यावेळी त्याने मला रणजी ट्रॉफी शिबिरात सामील करण्यास सांगितले होते. काही दिवस माझा खेळ बघितल्यानंतर रैनाने निवड समितीला मला रणजी संघात स्थान देण्यास सांगितले होते. प्रवीण कुमारने मला पाठिंबा दिल्यामुळे मी त्यांचाही आभारी आहे. रेल्वेविरुद्धच्या लढतीत रैना वर प्रवीण कुमार यांनी मला मार्गदर्शन केले होते.’
वेगवान गोलंदाज आकाशसाठी रॉयल्ससोबत जुळण्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे जयदेव उनाडकट याच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा आहे. संघात स्थान मिळविण्याचा पहिला हक्क उनाडकटचा राहील, याची त्याला कल्पना आहे. तो म्हणाला, ‘माझ्यासाठी ही शिकण्याची संधी आहे. सिनिअर खेळाडू मैदानात व मैदानाबाहेर कसे वागतात हे समजून घेता येईल.’ या तिघांमध्ये यशस्वी सर्वांत प्रभावी आहे.