‘राजस्थान’ने मिळवले दुसरे स्थान; ‘लखनौ’चा २४ धावांनी पराभव

राजस्थान रॉयल्सने दणदणीत विजय मिळवताना लखनौ सुपरजायंट्सचा २४ धावांनी पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 08:49 AM2022-05-16T08:49:16+5:302022-05-16T08:50:29+5:30

whatsapp join usJoin us
rajasthan royals got second place defeated lucknow defeated by 24 runs in ipl 2022 | ‘राजस्थान’ने मिळवले दुसरे स्थान; ‘लखनौ’चा २४ धावांनी पराभव

‘राजस्थान’ने मिळवले दुसरे स्थान; ‘लखनौ’चा २४ धावांनी पराभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राजस्थान रॉयल्सने दणदणीत विजय मिळवताना लखनौ सुपरजायंट्सचा २४ धावांनी पराभव केला. यासह ‘राजस्थान’ने गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवताना प्ले ऑफच्या दिशेने भक्कम वाटचाल केली. प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १७८ धावांची मजल मारल्यानंतर ‘राजस्थान’ने ‘लखनौ’ला ८ बाद १५४ धावांवर रोखले. लखनौची एका स्थानाने तिसऱ्या स्थानी घसरण झाली.

धावांचा पाठलाग करताना लखनौची फलंदाजी कोसळली. दीपक हुडाने ३९ चेंडूंत ५ चौकार व २ षट्कारांसह ५९ धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. त्याला अपेक्षित साथ लाभली नाही. कृणाल पांड्याने २३ चेंडूंत २५ धावा केल्या. ट्रेंट बोल्ट, ओबेड मॅककॉय आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी २ बळी घेत लखनौचे कंबरडे मोडले. 

तत्पूर्वी, ‘राजस्थान’ने फलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर आव्हानात्मक मजल मारली. यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल व कर्णधार संजू सॅमसन यांची फटकेबाजी राजस्थानसाठी महत्त्वाची ठरली. लखनौने तब्बल ८ गोलंदाज वापरले. नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 

यशस्वी आणि सॅमसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी ६४ धावांची भागीदारी केली. सॅमसनने २४ चेंडूंत ६ चौकारांसह ३२ धावा केल्या. यशस्वी २९ चेंडूंत ६ चौकार व एका षट्कारासह ४१ धावांचा तडाखा देऊन परतला. पडिक्कलनेही १८ चेंडूंत ५ चौकार व २ षट्कारांसह ३९ धावा केल्या. रवी बोश्नोईने २, तर आवेश खान, जोसन होल्डर आणि आयुष बदोनी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ६ बाद १७८ धावा (यशस्वी जैस्वाल ४१, देवदत्त पडिक्कल ३९, संजू सॅमसन ३२; रवी बोश्नोई २/३१.) वि.वि. लखनौ सुपरजायंट्स : २० षटकांत ८ बाद १५४ धावा (दीपक हुडा ५९, कृणाल पांड्या २५; ट्रेंट बोल्ट २/१८, ओबेड मॅककॉय २/२०, प्रसिद्ध कृष्णा २/३२.)
 

Web Title: rajasthan royals got second place defeated lucknow defeated by 24 runs in ipl 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.