इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) राजस्थान रॉयल्स संघाने मुख्य प्रशिक्षक म्हणून ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक व माजी क्रिकेटपटू अँड्य्रू मॅकडोनाल्ड यांची नियुक्ती केली आहे. तीन वर्षांसाठी मॅकडोनाल्ड ही जबाबदारी सांभाळणार आहेत. 2019च्या हंगामात राजस्थान रॉयल्सला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे पॅडी अप्टन यांना मुख्य प्रशिक्षकावरून हटवण्यात आले.
मॅकडोनाल्डने 2012मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तत्पूर्वी तो 2009मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडूनही खेळला होता. ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमध्ये मॅकडोनाल्ड प्रशिक्षक म्हणून यशस्वी ठरला आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली व्हिक्टोरीया संघाने लिस्ट A स्पर्धेचे जेतेपद पटकावले. शिवाय शेफिल्ड शिल्डमधील मेलबर्न संघाने त्याच्याच मार्गदर्शनाखाली जेतेपद पटकावले होते. इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या 100 लीग स्पर्धेत बर्मिंगहॅम फोनिक्स संघाने त्याला करारबद्ध केले आहे.
IPLचा कालावधी वाढणार, रात्रीस खेळ चालणार; बीसीसीआय लवकरच घोषणा करणारइंडियन प्रीमिअर लीगच्या 2020च्या सत्राची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 2020च्या आयपीएलमध्ये संघ संख्या वाढणार असल्याची चर्चा रंगली होती. नव्या संघांसाठी बडे बडे उद्योगपती मैदानात उतरले असल्याची चर्चा आहे. आता आणखी एक नवीन अपडेट समोर येत आहे. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल ते 30 मे 2020 या कालावधीत आयपीएल स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या लीगचा कालावधी वाढणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) रात्रीच्या सामन्यांना अधिक पसंती देणार असल्यानं लीगचा कालावधी वाढणार आहे. प्रत्येक दिवशी केवळ एकच सामना खेळवला जावा, असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. त्यामुळे डबल हेडर सामन्यांची संख्या कमी होईल. या संदर्भात बीसीसीआय ब्रॉडकास्टर आणि फ्रँचायझींशी चर्चा करत आहे.