GT vs RR : चॅम्पियन गुजरातसमोर उपविजेत्यांचं आव्हान; टॉस जिंकून राजस्थाननं निम्मा 'गड' केला सर 

IPL 2023, GT vs RR Live Match : आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 07:13 PM2023-04-16T19:13:19+5:302023-04-16T19:13:47+5:30

whatsapp join usJoin us
Rajasthan Royals have won the toss and they've decided to bowl first against gujarat titans | GT vs RR : चॅम्पियन गुजरातसमोर उपविजेत्यांचं आव्हान; टॉस जिंकून राजस्थाननं निम्मा 'गड' केला सर 

GT vs RR : चॅम्पियन गुजरातसमोर उपविजेत्यांचं आव्हान; टॉस जिंकून राजस्थाननं निम्मा 'गड' केला सर 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

GT vs RR Live Match । अहमदाबाद : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील तेविसावा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला जात आहे. गतविजेता संघ आणि मागील हंगामाचा उपविजेता संघ आज अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार आहे. आपल्या मागील सामन्यात गुजरातने पंजाब किंग्जचा पराभव केला होता. आजच्या सामन्यासाठी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यजमान संघ प्रथम फलंदाजी करताना दिसेल. 

दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा संघ आताच्या घडीला गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना संजू सॅमसनच्या संघाला फायदा होण्याची आशा आहे. कारण अहमदाबादच्या या मैदानावर बहुतांश कर्णधारांचा लक्ष्याचा पाठलाग करण्याकडे अधिक कल असतो. त्यामुळे उपविजेते गतविजेत्यांचा विजयरथ रोखणार का हे पाहण्याजोगे असेल.

आजच्या सामन्यासाठी गुजरातचा संघ - 

रिद्धिमान साहा, शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा.

आजच्या सामन्यासाठी राजस्थानचा संघ - 

जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, डम झाम्पा, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल.

Web Title: Rajasthan Royals have won the toss and they've decided to bowl first against gujarat titans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.