- रोहित नाईक
आयपीएचे पहिले विजेते. राजस्थान रॉयल्सने आॅस्टेÑलियाचा दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्नच्या नेतृत्वात दमदार कामगिरी करताना २००८ साली कोणाच्याही ध्यानीमनी नसताना विजेतेपदाला गवसणी घातली. तेव्हापासून प्रत्येक संघ राजस्थान रॉयल्सविरुद्ध पूर्ण सावधगिरी बाळगतो. कोणत्याही विशिष्ट खेळाडूवर अवलंबून नसलेल्या राजस्थान रॉयल्सचा कोणता खेळाडू कधी क्लिक होईल याचा काहीच नेम नसतो.
परंतु, असे असले तरी २००८ सालचे जेतेपद वगळता राजस्थानला गेल्या ११ वर्षांत एकदाही अंतिम फेरी गाठता आलेली नाही. २०१३ साली तिसरे स्थान पटकावलेल्या राजस्थानने २०१५ आणि २०१८ साली चौथे स्थान पटकावले आहे. तसेच, चेन्नई सुपरकिंग्जप्रमाणे २०१३ साली आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात दोषी आढळल्याने राजस्थानलाही २०१६ आणि २०१७ अशी दोन वर्षे निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. गेल्या सत्रात राजस्थानला शेवटून दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.
यंदा त्यांनी आपल्या संघात अनेक बदल करताना युवा व अनुभवी खेळाडूंना स्थान दिले आहे. आॅस्टेÑलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ राजस्थानचा कर्णधार असून त्याच्या जोडीला बेन स्टोक्स, डेव्हिड मिल्लर, जोस बटलर, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन आणि युवा यशस्वी जैस्वाल आहेत. राजस्थानकडे विदेशी खेळाडूंची मजबूत फळी आहे.
सर्वोत्तम कामगिरी : 2008 साली विजेते
फलंदाजी :
कर्णधार स्मिथ, डेव्हिड मिल्लर, जोस बटलर, मनन वोहरा, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन व यशस्वी जैस्वाल यांच्यावर मुख्य मदार.
गोलंदाजी :
जयदेव उनाडकट, ओशाने थॉमस या प्रमुख वेगवान गोलंदाजांसह राजस्थानकडे अँड्रयू टाय, टॉम कुरेण व अंकित राजपूत यांचा पर्याय आहे. फिरकी गोलंदाजीसाठी ईश सोधी, मयांक मार्कंडेय आणि श्रेयश गोपाल यांच्यावर जबाबदारी असेल.
मुख्य ताकद :
अष्टपैलू बेन स्टोक्स कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटण्यात तरबेज आहे. तसेच गोलंदाजीतही टिच्चून मारा करण्याची क्षमता. याशिवाय सर्वांची नजर असेल ती युवा यशस्वी जैस्वालवर. संधी मिळाल्यास तो संघाला आक्रमक सुरुवात करून देऊ शकतो.
Web Title: Rajasthan Royals: IPL 06 days left
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.