गुलाबी जर्सी अन् इतिहासाचा 'रॉयल' वारसा! द्रविडची झलक दिसली; RR ची टीम शेन वॉर्नलाही नाही विसरली

आगामी हंगामासाठी राजस्थान रॉयल्सच्या संघानं आपली नवी जर्सी लॉन्च केली आहे.    

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:17 IST2025-01-29T17:16:13+5:302025-01-29T17:17:03+5:30

whatsapp join usJoin us
Rajasthan Royals Revels New Jersey For IPL 2025 Know About Special Things | गुलाबी जर्सी अन् इतिहासाचा 'रॉयल' वारसा! द्रविडची झलक दिसली; RR ची टीम शेन वॉर्नलाही नाही विसरली

गुलाबी जर्सी अन् इतिहासाचा 'रॉयल' वारसा! द्रविडची झलक दिसली; RR ची टीम शेन वॉर्नलाही नाही विसरली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग (IPL) च्या १८ व्या हंगामाची उत्सुकता हळू हळू वाढताना दिसत आहे. मार्च महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात या स्पर्धेला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. नव्या हंगामासाठी संघ बांधणी केल्यावर आता फ्रँचायझी संघ वेगवेगळ्य़ा गोष्टींसह स्पर्धेच्या तयारीला लागले आहेत. आगामी हंगामासाठी राजस्थान रॉयल्सच्या संघानं आपली नवी जर्सी लॉन्च केली आहे.    

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

राजस्थान रॉयल्सनं शेअर केली नव्या जर्सीची खास झलक

राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी संघानं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संघाच्या नव्या जर्सीची झलक पाहायला मिळते. गुलाबी शहराचं प्रतिनिधीत्व करणारा संघानं जर्सीचा गुलाबी रंग नव्या हंगामासाठीही कायम ठेवलीये. जर्सीच्या माध्यमातून आम्ही राजस्थानचा इतिहास जपतोय, या गोष्टीवरही फ्रँचायझी संघानं जोर दिल्य्याचे दिसून येते. 

द्रविडची झलक दिसली, संघ वॉर्नरला नाही विसरला

व्हिडिओमध्ये राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची झलकही पाहायला मिळते. एवढेच नाही तर या संघाला पहिली वहिली ट्रॉफी जिंकून देणारा दिवंगत क्रिकेटर शेन वॉर्नसह शेन वॉटसन, स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर आणि रविचंद्रन अश्विन यांचाही उल्लेख आवर्जून करण्यात आला आहे.

मोठ्या बदलासह मैदानात उतरणार आहे राजस्थान रॉयल्सचा संघ
 
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालीच पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएलरच्या रण संग्रामात उतरणार आहे. मागील दोन हंगामात राजस्थानच्या संघाने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. पण दुसरे जेतेपद मिळवण्यात संघ अपयशी ठरला. नव्या हंगामात संघात अनेक नवे चेहरे दिसणार आहेत.
  
आयपीएल २०२५ साठी असा आहे राजस्थान रॉयल्स संघ

संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षणा, वानिंदू हसरंगा, आकाश मढवाल, कुमार कार्तिकेय, नीतीश राणा, तुषार देशपांडे, शुभम दुबे, युद्धवीर चरक, फजलहक फारूकी, क्वेना मफाका, अशोक शर्मा, वैभव सूर्यवंशी.

Web Title: Rajasthan Royals Revels New Jersey For IPL 2025 Know About Special Things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.