शारजाह : किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध रविवारी खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) लढतीत संजू सॅमसन आपला फॉर्म कायम राखण्यास प्रयत्नशील असेल तर जोस बटलरच्या आगमनामुळे राजस्थान रॉयल्सचा संघ अधिक मजबूत झाला आहे. मनोधैर्य उंचावणाºया विजयानंतर किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान दोन्ही संघ विजयी मोहीम कायम राखण्यास प्रयत्नशील असतील. उभय संघांदरम्यान सर्वाधिक षटकार ठोकण्याचीसुद्धा स्पर्धा असेल.
किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध ९७ धावांच्या विजयादरम्यान केवळ ६९ चेंडूंना सामोरे जाताना १३२ धावा केल्या. युवा सॅमसनने याच स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ३२ चेंडूंमध्ये ७४ धावांची खेळी केली होती. बटलर यशस्वी जयस्वालच्या साथीने डावाची सुरुवात करेल, अशी आशा आहे तर स्मिथ फलंदाजी क्रमामध्ये डेव्हिड मिलरच्या स्थानी उतरेल. किंग्स इलेव्हन पंजाबतर्फे मोहम्मद शमी व वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉट्रेल गोलंदाजीची धुरा सांभाळतील.
पंजाबविरुद्ध पहिला सामना खेळण्यास उत्सुक आहे. ‘सहकाऱ्यांसोबत सराव करत सकारात्मक ऊर्जेचा संचार झाला. सर्वजण आनंदी असून विजयी वाटचाल अशीच सुरू राहील, अशी अपेक्षा आहे.
-जोस बटलर
Web Title: Rajasthan Royals strong with the arrival of Jose Butler
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.