संजू सॅमनला ( Sanju Samson) भारतीय संघाकडून पुरेशी संधी मिळाली नसल्याची खंत त्याच्या चाहत्यांमध्ये आहे. २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघात पदार्पण करणाऱ्या संजूला ८ वर्षांत केवळ १७ सामने खेळण्याची संधी दिली आहे. ११ वन डे सामने त्याने खेळले आहेत. असे असले तरी संजूचा खूप मोठा फॅन फॉलोअर पाहायला मिळतो.... भारतीय संघाकडून त्याला जेव्हा जेव्हा खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा संजूचे फॅन स्टेडियमवर मोठ्या संख्येने आलेले पाहायला मिळाले. अगदी आयर्लंडमध्येही संजूचा चाहतावर्ग पाहायला मिळाला होता. संजूची एवढी क्रेझ का आहे, याचे उत्तर आता मिळाले आहे.
संजूने आयपीएलमध्ये १५२ सामन्यांत १३७.१९च्या स्ट्राईक रेटने ३८८८ धावा केल्या आहेत. २०२२च्या मेगा ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्सने १४ कोटी मोजून संजूला आपल्या संघात कायम राखले होते. त्याच्या नेतृत्वाखाली RR ने २०२२ च्या आयपीएलमध्ये फायनलपर्यंत धडक मारली होती. २००८ नंतर RR प्रथमच आयपीएल फायलन खेळला होता. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला आयपीएल फ्रँचायझी १४ कोटी पगार देते, तर बीसीसीआयने त्याला C ग्रेडमध्ये स्थान दिले आहे आणि त्यासाठी त्याला वर्षाला १ कोटी पगार मिळतो.
''संजू सॅमसन १५ कोटी पगारातील जवळपास २ कोटी रुपये हे स्थानिक खेळाडू आणि होतकरू मुलांना मदत करण्यासाठी खर्च करतो. एक चांगल्या खेळाडूसोबतच संजू चांगला व्यक्ती आहे आणि त्यामुळेच त्याचा एवढा मोठा चाहता वर्ग आहे,''असे राजस्थान रॉयल्सचा ट्रेनरने सांगितले. तो पुढे म्हणाला, २०२१च्या आयपीएलनंतर मी संजूला दुसऱ्या मोठ्या टीमकडून खेळण्याचा सल्ला दिला होता, तेव्हा त्याने म्हटलेले की, मला