Join us  

राजस्थान रॉयल्सला सुपरकिंग्सचे आव्हान

पराभवाच्या हॅट्ट्रिकनंतर विजयाची चव चाखलेल्या राजस्थान रॉयल्सला शुक्रवारी आयपीएलमध्ये ‘करा किंवा मरा’ अशा लढतीत बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्सचे आव्हान असेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 1:02 AM

Open in App

जयपूर - पराभवाच्या हॅट्ट्रिकनंतर विजयाची चव चाखलेल्या राजस्थान रॉयल्सला शुक्रवारी आयपीएलमध्ये ‘करा किंवा मरा’ अशा लढतीत बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्सचे आव्हान असेल.सततच्या पराभवामुळे राजस्थान संघ स्पर्धेबाहेर होण्याच्या वाटेवर होता. मात्र किंग्ज इलेव्हन पंजाबवर १५ धावांनी मिळालेला विजय रॉयल्ससाठी संजीवनी ठरला. या संघाला बाद फेरी गाठायची झाल्यास खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात सुधारणा करावी लागेल. उर्वरित सामने देखील सांघिक कामगिरीच्या बळावर जिंकावे लागणार आहेत. उभय संघांदरम्यान याआधी पुण्यात झालेल्या सामन्यात चेन्नईने राजस्थानला ६४ धावांनी धूळ चारली होती. सध्याच्या सत्रात रॉयल्सची कामगिरी साधारण राहिली. दहा सामन्यात आठ गुणांसह हा संघ सहाव्या स्थानावर आहे. प्ले आॅफची आशा जिवंत ठेवण्यासाठी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील या संघाला आज कुठल्याही स्थितीत विजय मिळवावाच लागेल. पराभव झाल्यास संघ प्ले आॅफमधून बाहेर पडेल.घरच्या मैदानावर चारपैकी तीन सामने जिंकणाऱ्या राजस्थानला आजचा सामना देखील येथेच खेळायचा आहे. पण फलंदाजी आणि गोलंदाजीतील अपयशाचा फटका प्रत्येक सामन्यात बसत आला. या संघात रहाणेसह संजू सॅमसन, अष्टपैलू बेन स्टोक्स, राहुल त्रिपाठी, जोस बटलर आदी फलंदाज तर कृष्णप्पा गौतम, ईश सोढी आणि जोफ्रा आर्चर हे गोलंदाज आहेत. सीएसके दहा सामन्यात १४ गुणांसह दुसºया स्थानावर आहे. उर्वरित चार सामन्यांपैकी एक विजय मिळाला तरी हा संघ प्ले आॅफ खेळेल. (वृत्तसंस्था)महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात सर्वच फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत पण गोलंदाजी मात्र चिंतेचा विषय ठरतो. फिरकीपटू रवींद्र जडेजा, हरभजनसिंग, लुंगी एनगिडी, डेव्हिड विले, शार्दुल ठाकूर यांना जबाबदारीने मारा करावा लागणार आहे. अंबाती रायुडूने दहा सामन्यात ४२३ धावा केल्या असून सर्वाधिक धावा काढणाºयांत तो तिसºया स्थानावर आहे. धोनीने तीन अर्धशतकांसह ३६० धावा ठोकल्या आहेत.वेळ : रात्री ८ वाजतास्थळ : सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर

टॅग्स :आयपीएल 2018क्रिकेटराजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्स