रोमहर्षक! राजस्थान रॉयल्सची विजयी मालिका खंडित, गुजरात टायटन्सने रोखला अश्वमेध

राजस्थान रॉयल्सची इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मधील विजयी घोडदौड गुजरात टायटन्सने रोखली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:47 PM2024-04-10T23:47:43+5:302024-04-10T23:48:42+5:30

whatsapp join usJoin us
Rajasthan Royals' winning streak broken, RASHID KHAN & RAHUL TEWATIA HAVE DONE IT...!!!!! They Won the Match for Gujarat Titans in Under pressure run chase against Rajasthan Royals | रोमहर्षक! राजस्थान रॉयल्सची विजयी मालिका खंडित, गुजरात टायटन्सने रोखला अश्वमेध

रोमहर्षक! राजस्थान रॉयल्सची विजयी मालिका खंडित, गुजरात टायटन्सने रोखला अश्वमेध

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 : Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : राजस्थान रॉयल्सची इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मधील विजयी घोडदौड गुजरात टायटन्सने रोखली. RRला त्यांच्या पाचव्या सामन्यात GT कडून हार पत्करावी लागली. कर्णधार संजू सॅमसन व रियान पराग यांच्या दमदार खेळीनंतर कुलदीप सेन व युझवेंद्र चहल यांनी गोलंदाजीत कमाल केली. पण, शुबमन गिल मैदानावर उभा राहून ७२ धावा चोपून गेला आणि राहुल तेवाटिया व राशिद खान यांनी मॅच फिनिश केली. 


प्रत्युत्तरात शुबमन गिल व साई सुदर्शन यांनी GT ला आश्वासक सुरुवात करून दिली, परंतु त्यांच्या धावांची गती संथ होती. कुलदीप सेनने त्याच्या पहिल्या व सामन्यातील ९व्या षटकात पहिला धक्का दिला. साई २९ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३५ धावांवर पायचीत झाला. शुबमन मैदानावर उभा राहिला आणि तो आयपीएलमध्ये ३००० धावा करणारा तो ( वर्ष व २१५ दिवस) सर्वात युवा फलंदाज ठरला. पण, त्याला अन्य सहकाऱ्यांकडून साथ मिळाली नाही. कुलदीप सेनने RR ला आणखी दोन यश मिळवून दिले. त्याने मॅथ्य वेड ( ४) व अभिनव मनोहर ( १) यांचे त्रिफळे उडवले. 

शुबमन मैदानावर उभा असल्याने गुजरातच्या आशाही जीवंत होत्या, परंतु विजय शंकर ( १६) नंतर  युझवेंद्र चहलने मोठ्या चतुराईने त्याला सापळ्यात ओढले. शुबमन ४४ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ७२ धावांवर स्टम्पिंग आऊट केले.  शुबमन बाद झाला तेव्हा गुजरातला २८ चेंडूंत ६४ धावा करायच्या होत्या. शाहरुख खानने १७व्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर १७ धावा चोपून सामना पुन्हा गुजरातच्या बाजूने झुकवला होता. पण, आवेश खानने १८व्या षटकात शाहरुखला ( १४) पायचीत करून GT ला मोठा धक्का दिला. GT ला विजयासाठी १२ चेंडूंत ३२ धावांची आवश्यकता होती आणि आता सर्व लक्ष राहुल तेवाटिया व राशिद खान यांच्यावर होते. 


तेवाटिया व राशिद यांनी ६ चेंडू १५ धावा असा सामना खेचून आणला. २ चेंडूंत ४ धावा हव्या असताना तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात तेवाटिया ( २१) रन आऊट झाला. राशिदने ( २४*) शेवटच्या चेंडूवर चौकार खेचून ३ विकेट्सने विजय मिळवला. 
 


तत्पूर्वी, यशस्वी जैस्वाल ( २४) आणि जॉस बटलर ( ८) स्वस्तात बाद झाले.  कर्णधार संजू सॅमसन व रियान पराग यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७८ चेंडूंत १३० धावांची भागीदारी करून संघाला सावरले. परागने ४८ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ७६ धावा चोपल्या. संजू ३८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६८ धावांवर नाबाद राहिला. राजस्थानने ३ बाद १९६ धावा उभ्या केल्या.  

Web Title: Rajasthan Royals' winning streak broken, RASHID KHAN & RAHUL TEWATIA HAVE DONE IT...!!!!! They Won the Match for Gujarat Titans in Under pressure run chase against Rajasthan Royals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.