नवी दिल्ली : सध्या आयपीएलच्या सोळाव्या (IPL 2023) हंगामाचा थरार रंगला आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाचा युवा खेळाडू रियान परागसाठी यंदाचा हंगाम म्हणजे एक वाईट स्वप्नच. रियान पराग अद्याप धावा करण्यासाठी संघर्ष करत आहे. राजस्थानच्या शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सविरूद्ध रियान ६ चेंडूत ४ धावा करून बाद झाला होता.
रियान परागला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघात स्थान देण्यात आले होते, पण तो दोन आकडी देखील धावसंख्या करू शकला नाही. त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. परागने आयपीएल २०२३ मध्ये सहा डावात १०७ च्या स्ट्राईक रेटने आणि ११.६० च्या सरासरीने फक्त ५८ धावा केल्या आहेत. रियान पराग भावूकसततच्या अपयशानंतर रियान पराग भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "वेळ चांगली असो किंवा वाईट, निघून जाते." आयपीएलच्या माध्यमातून अनेक युवा खेळाडू स्वत:ला सिद्ध करत असतात. या मोठ्या व्यासपीठावर खेळून ते आपल्या क्रीडा कौशल्याने जगाला आपली नोंद घ्यायला भाग पाडतात. अनेक युवा खेळाडू असे आहेत ज्यांनी आयपीएलमध्ये चमकदार खेळ करून आंतरराष्ट्रीय संघात जागा मिळवली आहे.
परागची अग्निपरीक्षा २१ वर्षीय रियान परागचा राजस्थान रॉयल्सचा संघ आताच्या घडीला क्रमवारीत चौथ्या स्थानी स्थित आहे. त्याला राजस्थानच्या फ्रँचायझीने ३.८ कोटी रूपयांमध्ये खरेदी केले होते. पण त्याचा या हंगामात फ्लॉप शो सुरूच आहे. त्यामुळे आगामी काळात परागला सातत्याने संधी मिळणार का आणि तो या संधीचे सोने करतो का? हे पाहण्याजोगे असेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"