Riyan Parag : रियान परागसाठी आयपीएल २०२४ चा हंगाम खूप खास राहिला. या हंगामात त्याने सातत्याने चमकदार कामगिरी करून सर्वांना प्रभावित केले. विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडनंतर तो सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानी राहिलेल्या रियानने भारताच्या आंतरराष्ट्रीय संघात संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
रियान पराग म्हणाला की, मी भारतीय संघाकडून लवकरच खेळेन... काहीही झाले तरी हे होणारच आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांना (निवडकर्त्यांना) माझी निवड करावीच लागेल, हो की नाही? असा मला विश्वास आहे. स्वत:वर असलेला विश्वास सांगणे म्हणजे घमंडीपणा नव्हे. मी जेव्हा फॉर्ममध्ये नव्हतो तेव्हा देखील सांगितले होते मी टीम इंडियासाठी नक्की खेळेन. मी वयाच्या १० व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. रियान पराग 'पीटीआय' या वृत्तवाहिनीशी बोलत होता.
२ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेविरूद्ध द्विपक्षीय मालिका खेळेल. या मालिकेत रियानला संधी मिळेल असे त्याला वाटते. तो म्हणाला की, पुढचा दौरा असो की मग सहा महिने की मग एक वर्ष. मी कधी भारतीय संघातून खेळेन याबद्दल जास्त विचार करत नाही. हे निवडकर्त्यांचे काम आहे.
IPL २०२४ मध्ये रियान सुस्साट
रियान परागने २०१९ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. पण, आयपीएल २०२४ च्या आधी त्याला एकदाही एका हंगामात २०० हून अधिक धावा करता आल्या नाहीत. त्याच्या नावावर केवळ दोन अर्धशतकांची नोंद होती. पण, आयपीएलच्या सतराव्या हंगामात चमकदार कामगिरी करताना त्याने आपली छाप सोडली. या हंगामात १५ सामन्यांत त्याने १४८.२२ च्या स्ट्राईक रेटने ५७३ धावा केल्या, ज्यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. ८४ नाबाद ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. रियानने आयपीएल २०२४ मध्ये ४० चौकार आणि ३३ षटकार ठोकले.
Web Title: rajasthan royals's star batter Riayan Parag said, definitely I will play for India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.