Join us  

रजत शर्मा यांचा डीडीसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

कामाचे वातावरण नसल्याची खंत; जेटलींच्या निधनानंतर तीन महिन्यांत ‘विकेट’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 1:45 AM

Open in App

नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांनी दिल्ली व जिल्हा क्रिकेट समितीच्या (डीडीसीए) अध्यक्षपदाचा राजीनामा शनिवारी बीसीसीआयकडे सोपविला. माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर तीनच महिन्यांत शर्मा यांची ‘विकेट’ गेल्याची चर्चा आहे.रजत शर्मा यांनी राजीनामापत्रात पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानले आहेत. पण, दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (डीडीसीए) अध्यक्षपदावर असलो तरीही संचालकांनी अधिकार काढून घेतले होते, असा आरोप करून, ‘या संघटनेत काम करणे सोपे नाही, अशी भावनाही व्यक्त केली आहे. सातत्याने पाय ओढणे, कामात अडथळा निर्माण करणे, दबावात काम करण्यास भाग पाडणे, अशा वातावरणात मी काम करू शकत नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे.‘क्रिकेट व क्रिकेटपटूंच्या भल्यासाठी काम करणे हाच माझा हेतू होता. पण, प्रशासनातील काही स्वार्थी वृत्ती क्रिकेटचे नुकसान करीत असल्याचे मला वाटते. प्रामाणिकता व पारदर्शकतेच्या तत्वांनी इथे काम करणे अशक्य असल्याने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे रजत शर्मा यांनी म्हटले आहे. रजत शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य सुनील वॉल्सन आणि यशपाल शर्मा यांनीही आपापल्या पदांचे राजीनामे सोपविले.आधारच हरवलारजत शर्मा व अरुण जेटली यांची महाविद्यालयीन जीवनापासून मैत्री होती. जेटलींमुळेच शर्मा यांचा क्रिकेट प्रशासनात प्रवेश झाला होता. जेटलींच्या निधनानंतर फिरोजशहा कोटला स्टेडियमला अरुण जेटली यांचे नाव देण्याचा प्रस्तावही रशर्मा यांनीच आणला होता. आॅगस्टमध्ये जेटलींचे निधन झाल्यानंतर शर्मा यांचा डीडीसीएतील आधार हरवला होता. शिवाय डीडीसीएचे महासचिव विनोद तिहारा यांच्याशी त्यांचे वादही सर्वज्ञात होते.

टॅग्स :रजत शर्माअरूण जेटली