Join us

१२ Six, ४ Four! १४० किलोच्या फलंदाजाचा 'वजनदार' खेळ; २२१ धावांचे लक्ष्य सहज पार, Video 

१४० किलो वजनाचा क्रिकेटपटू रहकीम कॉर्नवॉलने ( RAKHEEEM CORNWALL) ने कॅरेबियन प्रीमियर लीग २०२३ ( CPL 2023) मध्ये नवा इतिहास रचला आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 15:07 IST

Open in App

१४० किलो वजनाचा क्रिकेटपटू रहकीम कॉर्नवॉलने ( RAKHEEEM CORNWALL) ने कॅरेबियन प्रीमियर लीग २०२३ ( CPL 2023) मध्ये नवा इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिजच्या रहकीमने CPLमध्ये वादळी खेळी केली आणि अवघ्या ४५ चेंडूंत शतक झळकावले. बार्बाडोज रॉयल्स आणि सेंट किट्स- नेव्हिस पॅट्रियट्स यांच्यातल्या सामन्यात हा वादळी खेळ पाहायला मिळाला. सेंट किट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून २२० धावा केल्या. आंद्रे फ्लॅटरने ५६ आणि कर्णधार रुदरफोर्डने २७ चेंडूत ६५ धावा केल्या. या दोघांशिवाय विल स्मीडनेही ३६ चेंडूत ६३ धावांची खेळी केली.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी रहकीम कॉर्नवॉल आणि काइल मेयर्स यांनी डावाला सुरुवात केली. रहकीमने संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि प्रत्येक गोलंदाजावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. रहकीमने पहिल्या २३ चेंडूत ६ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर पुढच्या २२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने अवघ्या ४५ चेंडूत १०० धावा केल्या. त्याच्या खेळीत १२ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. त्याने २१२.५० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. रहकीमने २ विकेट्सही घेतल्या.  

  बार्बाडोस रॉयल्स संघाने १८.१ षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. कर्णधार रोव्हमन पॉवेल ४९ धावांवर नाबाद राहिला तर काइल मेयर्सने २२ धावा केल्या. 

टॅग्स :कॅरेबियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट
Open in App