खरा नाही, ड्युप्लिकेट विराट कोहली अयोध्येत; लोकांनी घेरलं अन् पुढे काय झालं? पाहा Video

निमंत्रण खऱ्या विराट कोहलीला अन् अयोध्येत पोहचला ड्युप्लिकेट...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 09:40 PM2024-01-22T21:40:39+5:302024-01-22T21:40:55+5:30

whatsapp join usJoin us
Ram Mandir Ayodhya Virat Kohli: duplicate Virat Kohli in Ayodhya; People surrounded and what happened next? Watch the video | खरा नाही, ड्युप्लिकेट विराट कोहली अयोध्येत; लोकांनी घेरलं अन् पुढे काय झालं? पाहा Video

खरा नाही, ड्युप्लिकेट विराट कोहली अयोध्येत; लोकांनी घेरलं अन् पुढे काय झालं? पाहा Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ram Mandir Ayodhya Virat Kohli: आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. पाचशे वर्षांचा वनवास भोगल्यानंतर अयोध्यापती भगवान श्रीराम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना निमंत्रणे पाठवण्यात आली होती. यात क्रिकेटपटू विराट कोहलीचाही समावेश आहे. पण, काही कारणास्तव तो या सोहळ्याला येऊ शकला नाही. पण, आता विराट कोहलीचा अयोध्येतील एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना निमंत्रणे देण्यात आली होती. बॉलिवूड, उध्योग आणि क्रिकेट विश्वातील अनेकजण या सोहळ्याला उपस्थित होते. पण, काही वैयक्तिक कारणास्तव भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) या सोहळ्यात हजर राहू शकला नाही. पण, आता विराट कोहलीचा अयोध्येतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण, हा खरा विराट नसून, त्याचा ड्युप्लिकेट आहे. 

विराट कोहलीचा ड्युप्लिकेट इंडियन जर्सीमध्ये अयोध्येच्या रस्त्यांवर फिरताना दिसला. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी त्याला खरा विराट समजले आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली. काही वेळानंतर सर्वांना समजले की, तो खरा विराट नाही, तरीदेखील त्याच्यासोबत फोटो घेण्यासाठी गर्दी वाढत गेली. यावेळी ड्युप्लिकेट विराटला गर्दीतून बाहेर काढण्यासाठी पोलीस आले, पण गर्दीसमोर त्यांचेही काही चालू शकले नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

विराट कोहलीची पहिल्या दोन कसोटीतून माघार
विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे. विराटने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) वैयक्तिक कारणांमुळे विश्रांतीची विनंती केली होती आणि मान्य केली गेली आहे. विराटने कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांशी चर्चा केली. देशाचे प्रतिनिधित्व करणे हे नेहमीच त्याचे सर्वोच्च प्राधान्य आहे, परंतु काही वैयक्तिक परिस्थिती त्याच्या उपस्थितीची मागणी करत आहेत, असे विराटने BCCI ला कळवले.
 

Web Title: Ram Mandir Ayodhya Virat Kohli: duplicate Virat Kohli in Ayodhya; People surrounded and what happened next? Watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.