केवळ देशातील नव्हे, तर जगभरातील कोट्यवधी रामभक्त गेली अनेक वर्षे जे स्वप्न पाहत होते, त्या राम मंदिराच्या स्वप्नाची पूर्ती बुधवारी होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार असले तरी हा सोहळा सर्वांना दूरदर्शनवरून थेट पाहता येणार आहे. राम मंदिराच्या भूमी पूजन होत असल्यामुळे सोशल मीडियावरही शुभेच्छा अन् कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण, भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यानं केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांची वाहवाह मिळवत आहे.
अयोध्या तो झांकी है उसके बाद भी बहुत कुछ बाकी है!; बबिता फोगाटचे ट्विट व्हायरल
मोहम्मद कैफनं ट्विट केलं की,''अलाहाबाद येथे लहानाचा मोठा झालो... गंगा-जमूनाच्या संस्कृती असलेल्या अलाहाबादमध्ये मला रामलीला पाहणे नेहमी आवडायचे. दया, सन्मान, मोठेपणा आणि अस्तित्व यांची शिकवण रामलीलातून मिळायची. भगवान रामानं प्रत्येकाचा चांगुलपणाच पाहिला आणि आपल्या आचरणाने त्याचा वारसा प्रतिबिंबित केला पाहिजे. प्रेम आणि ऐक्याच्या मार्गात द्वेष पसरवणाऱ्यांना थारा देऊ नका.''
आयर्लंडकडून 2011च्या वर्ल्ड कप मधील विजयाची पुनरावृत्ती; इंग्लंडला दिली मात
'तो' वर्ल्ड रेकॉर्ड महेंद्रसिंग धोनीच्या नावावर राहिला नाही; इयॉन मॉर्गनची सरशी
हायलाईट्स
- राम मंदिराचे भूमीपूजन संपन्न; स्टेजवरील सोहळा सुरु होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून भूमीपूजन
- जगभरातून तब्बल 2.75 लाख चांदीच्या विटा पाठविल्या, त्यापैकी जय श्री राम लिहिलेल्या केवळ 100 विटा निवडल्या. त्यातील 9 विटा भूमीपूजनस्थळी.