Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ceremony of Lord Ram Lalla : अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात आज (दि. २२) रामलला विराजमान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुपारी १२:२० वाजता रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतीक्षा अवघ्या काही क्षणांपुरती राहिली आहे. भारतातील अनेक सेलिब्रेटी या सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत. विराट कोहली, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, वेंकटेश प्रसाद, रवींद्र जडेजा आदी क्रिकेटपटूंनी हजेरी लावली आहे. पण, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अद्याप दिसलेला नाही. रोहितला सोहळ्याचं आमंत्रण फार उशीरा मिळाल्याची चर्चा आहे, त्यात आता रोहित या सोहळ्याला जाणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे.
क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्मा आगामी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी २२ जानेवारीला हैदरााद येथे जाणार आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे आणि त्याच्या सरावासाठी रोहितने हैदराबादला जाण्याचा निर्णय घेतला आहे. २१ जानेवारीला रोहितने मुंबईत सराव करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, रोहितनेही या सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्याचा फोटो पोस्ट केलेला नाही. पण, PTI ने दिलेल्या वृत्तानुसार २० जानेवारीला रोहितला निमंत्रण दिले गेले आहे. जर तो सोमवारी भारतीय संघाच्या सराव सत्रात सहभागी होणार असेल, तर तो अयोध्येत जाणार नाही, हे जवळपास निश्चित आहे.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ:रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, एस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर. जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान. IND vs ENG Test Series २५ ते २९ जानेवारी - हैदराबाद, सकाळी ९.३० वाजल्यापासून०२ ते ०६ फेब्रुवारी - विशाखापट्टणम, सकाळी ९.३० वाजल्यापासून१५ ते १९ फेब्रुवारी - राजकोट, सकाळी ९.३० वाजल्यापासून२३ ते २७ फेब्रुवारी - रांची, सकाळी ९.३० वाजल्यापासून७ ते ११ मार्च - धर्मशाला, सकाळी ९.३० वाजल्यापासून