पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे ( PCB) माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी माजी गोलंदाज शोएब अख्तरने ( Shoaib Akhtar) बाबर आझम, कामरान अकमल आणि शाहीन आफ्रिदी यांच्यावर केलेल्या ताज्या टिप्पण्यांवर जोरदार टीका केली आहे. अख्तरने अलीकडेच बाबरच्या संवाद कौशल्यावर टीका केली होती आणि तो म्हणाला होता की पाकिस्तानच्या कर्णधाराने भारतीय सुपरस्टार विराट कोहलीसारखा मोठा ब्रँड व्हावा अशी त्याची इच्छा आहे.
हमारी भी रिस्पेक्ट है! वर्ल्ड कप खेळायला भारतात जाणार नाही; पाकिस्तानी खेळाडूची BCCI ला धमकी
माजी वेगवान गोलंदाजाने थेट टीव्ही कार्यक्रमात अकमलच्या 'स्क्रीन' शब्दाच्या उच्चाराचीही खिल्ली उडवली. एका स्थानिक टीव्ही चॅनेलवर बोलताना राजा म्हणाले की,''अख्तरने इतर माजी आणि सध्याच्या क्रिकेटपटूंबाबत अनावश्यक आणि वरचेवर विधाने करणे टाळावे. आमचे माजी खेळाडू भ्रामक विधाने करून आमचा क्रिकेट ब्रँड खराब करतात. भारतात असे घडताना तुम्हाला कधीच दिसणार नाही. सुनील गावस्कर हे राहुल द्रविडवर टीका करताना कधीच दिसणार नाही. हे फक्त पाकिस्तानमध्येच घडते, जिथे माजी खेळाडू इतरांना त्यांचे काम करू देत नाहीत."
अख्तर यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष होण्याच्या आकांक्षेबद्दल विचारले असता, राजा यांनी अख्तर यांना आधी ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, "पीसीबीच्या अध्यक्षपदासाठी पात्र होण्यासाठी त्याला प्रथम पदवीधर पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे.''
पाकिस्तानातील स्थानिक चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अख्तरने बाबरसह पाकिस्तानी खेळाडूंच्या इंग्रजीची खिल्ली उडवली होती. तो म्हणाला,''प्रेझेंटेसन सेरेमनीमध्ये हे खेळाडू कसे गोंधळलेले पाहायला मिळतात. इंग्रंजी शिकणं आणि बोलणं किती अवघड आहे? क्रिकेट खेळणं वेगळं अन् मीडियाशी संवाद साधता येणं वेगळं. तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही तुमचं मत टीव्हीवर व्यक्त करण्यात अपयशी ठराल. बाबर आजम हा पाकिस्तानातील मोठा ब्रँड होऊ शकतो आणि हे मी दाव्याने सांगतो. पण, तो आतापर्यंत का मोठा ब्रँड होऊ शकला? कारण, त्याला इंग्रजी बोलता येत नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Ramiz Raja advised Shoaib Akhtar to complete his graduation, in order to be eligible for the position of PCB chairman, ‘Become human first’, over Babar comment
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.