पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे ( PCB) माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी माजी गोलंदाज शोएब अख्तरने ( Shoaib Akhtar) बाबर आझम, कामरान अकमल आणि शाहीन आफ्रिदी यांच्यावर केलेल्या ताज्या टिप्पण्यांवर जोरदार टीका केली आहे. अख्तरने अलीकडेच बाबरच्या संवाद कौशल्यावर टीका केली होती आणि तो म्हणाला होता की पाकिस्तानच्या कर्णधाराने भारतीय सुपरस्टार विराट कोहलीसारखा मोठा ब्रँड व्हावा अशी त्याची इच्छा आहे.
हमारी भी रिस्पेक्ट है! वर्ल्ड कप खेळायला भारतात जाणार नाही; पाकिस्तानी खेळाडूची BCCI ला धमकी
माजी वेगवान गोलंदाजाने थेट टीव्ही कार्यक्रमात अकमलच्या 'स्क्रीन' शब्दाच्या उच्चाराचीही खिल्ली उडवली. एका स्थानिक टीव्ही चॅनेलवर बोलताना राजा म्हणाले की,''अख्तरने इतर माजी आणि सध्याच्या क्रिकेटपटूंबाबत अनावश्यक आणि वरचेवर विधाने करणे टाळावे. आमचे माजी खेळाडू भ्रामक विधाने करून आमचा क्रिकेट ब्रँड खराब करतात. भारतात असे घडताना तुम्हाला कधीच दिसणार नाही. सुनील गावस्कर हे राहुल द्रविडवर टीका करताना कधीच दिसणार नाही. हे फक्त पाकिस्तानमध्येच घडते, जिथे माजी खेळाडू इतरांना त्यांचे काम करू देत नाहीत."
अख्तर यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष होण्याच्या आकांक्षेबद्दल विचारले असता, राजा यांनी अख्तर यांना आधी ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, "पीसीबीच्या अध्यक्षपदासाठी पात्र होण्यासाठी त्याला प्रथम पदवीधर पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"