Join us  

Ramiz Raja: भारताला धमकावणाऱ्या रमीझ राजाची हकालपट्टी; PCBला मिळाला नवा अध्यक्ष 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्ष पदावरून रमीझ राजा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 2:08 PM

Open in App

नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्ष पदावरून रमीझ राजा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. अलीकडेच पार पडलेल्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा मायदेशात दारूण पराभव झाला. बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानच्या संघाला 0-3 ने कसोटी मालिका गमवावी लागली. घरच्या मालिकेत झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निर्णय घेतला असून रमीझ राजा यांची पीसीबी अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. रमीझ राजा यांनी बीसीसीआय आणि पीसीबी यांच्या वादावर दिवसेंदिवस वेगवेगळी विधानं करून सर्वांचे लक्ष वेधले होते. 

PCBला मिळाला नवा अध्यक्ष दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी नजम सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पीसीबीचे मावळते अध्यक्ष रमीझ राजा यांनी बीसीसीआयला इशारा देत भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. जर भारतीय संघ आगामी आशिया चषकासाठी पाकिस्तानात आला नाही तर पाकिस्तानी संघ देखील भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकावर बहिष्कार टाकेल अशी धमकी राजा यांनी दिली होती. यानंतर त्यांनी मवाळ भूमिका घेत भारत आणि पाकिस्तान यांची कसोटी क्रिकेटला गरज असल्याचे त्यांनी म्हटले होते.

खरं तर ऑक्टोबरमध्ये बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. याशिवाय आशिया चषकाची स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवावी अशी मागणी देखील त्यांनी केली. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लांबलचक पत्रक काढून बीसीसीआयवर टीका केली होती. अशातच आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण बदलल्यास पीसीबी विरोध करेल असे राजा यांनी म्हटले होते. मात्र आता खुद्द राजा यांची पीसीबीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

2023 मध्ये होणाऱ्या प्रमुख स्पर्धा 

  1. - आयसीसी महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका
  2. - आयसीसी 19 वर्षांखालील मुलींची ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा, दक्षिण आफ्रिका
  3. - आशिया चषक 2023, पाकिस्तान
  4. - आयसीसी क्रिकेट वन डे वर्ल्ड कप, भारत

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :पाकिस्तानबीसीसीआयआयसीसीएशिया कप 2022बाबर आजम
Open in App