Join us  

Ramiz Raja: "त्यांना यायचे नसेल तर नको येऊदे , भारताशिवाय खेळू", रमीझ राजा यांनी BCCIला दिला इशारा 

आशिया चषक 2023चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 5:00 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड (PKA vs ENG Test) यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. तब्बल 17 वर्षांनंतर इंग्लिश संघ पाकिस्तानच्या धरतीवर कसोटी मालिका खेळत आहे. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी एक वक्तव्य करून बीसीसीआयला आव्हान दिले आहे. खरं तर आशिया चषक 2023चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयने याआधीच स्पष्ट केले आहे. यावरूनच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी बीसीसीआयला आव्हान दिले आहे. 

रमीझ राजा यांनी म्हटले, "आशियाई क्रिकेट संघटनेने आम्हाला यजमानपद सांभाळण्याचा अधिकार दिला आहे. तरीदेखील भारत म्हणतो की आम्ही तिकडे येणार नाही. तर मी समजू शकतो त्यांचे काही राजकीय कारण असू शकते. पण आशिया चषक पाकिस्तानशिवाय कोणत्याही तटस्ठ ठिकाणी होणार नाही."

रमीझ राजा यांनी BCCIला दिला इशारा पीसीबी भारताव्यतिरिक्त इतर संघांसोबत आशिया चषक आयोजित करू शकते का असे विचारले असता, रमीझ राजा म्हणाले की, "आम्ही यजमान आहोत आणि आम्हाला हवे ते करू शकतो. पण आम्ही उपलब्ध आहोत, हा आमचा हक्क आहे. आम्हाला मिळालेल्या नाहीत अशा गोष्टी आम्ही मागत आहोत आणि आम्ही आग्रही आहोत." यानंतर श्रीलंका आणि बांगलादेशनेही माघार घेतल्यास काय होईल, असा आक्षेप घेतल्यानंतर रमीझ राजा यांनी आशिया चषक तटस्थ ठिकाणी हलवल्यास पाकिस्तान खेळणार नाही, असे उत्तर दिले. रमीझ राजा म्हणाले, "भारतीय संघ आला नाही तर नको येऊदे. पण जर तो (आशिया चषक) बाहेर म्हणजे तटस्थ ठिकाणी झाला तर आम्ही खेळणार नाही."

2023 मध्ये होणाऱ्या प्रमुख स्पर्धा 

  • - आयसीसी महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका
  • - आयसीसी 19 वर्षांखालील मुलींची ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा, दक्षिण आफ्रिका
  • - आशिया चषक 2023, पाकिस्तान
  • - आयसीसी क्रिकेट वन डे वर्ल्ड कप, भारत

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :पाकिस्तानबीसीसीआयजय शाहएशिया कप 2022भारत
Open in App