महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा बनला झारखंडचा सर्वाधिक करदाता, १३० कोटींची कमाई अन् किती कर दिला वाचा...

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा झारखंडचा सर्वात मोठा वैयक्तिक करदाता बनला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 04:40 PM2022-03-31T16:40:45+5:302022-03-31T16:41:19+5:30

whatsapp join usJoin us
ranchi ms dhoni ranchi cricket giant mahendra singh dhoni again became the biggest taxpayer of jharkhand | महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा बनला झारखंडचा सर्वाधिक करदाता, १३० कोटींची कमाई अन् किती कर दिला वाचा...

महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा बनला झारखंडचा सर्वाधिक करदाता, १३० कोटींची कमाई अन् किती कर दिला वाचा...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रांची

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा झारखंडचा सर्वात मोठा वैयक्तिक करदाता बनला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायला लागल्यापासून झारखंडमधून दरवर्षी सर्वाधिक वैयक्तिक कर भरण्याचा धोनीनं विक्रम केला आहे. कोरोना संसर्गाच्या काळातही धोनीचं उत्पन्न सुमारे १३० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. 

धोनीनं चालू आर्थिक वर्षात ३८ कोटी रुपयांचा कर भरला आहे. आगाऊ कराची ही रक्कम मागील वर्षीच्या तुलनेत आठ कोटी रुपयांनी अधिक आहे. गेल्या वर्षी 2020-21 या आर्थिक वर्षात त्यानं ३० कोटी रुपये आगाऊ कर भरला होता. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंग धोनीची कमाई इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून सर्वाधिक झाली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर केंद्र सरकारनं आयपीएलला परवानगी दिली होती.

IPL 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद सोडलं
इंडियन प्रीमियर लीग सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीनं धक्कादायक निर्णय घेत चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद सोडलं. माहीनं कर्णधार म्हणून रवींद्र जडेजाला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केलं. आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामापासून धोनीनं सीएसकेसाठी कर्णधारपद भूषवलं होतं. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 

Web Title: ranchi ms dhoni ranchi cricket giant mahendra singh dhoni again became the biggest taxpayer of jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.