Join us  

कसोटीनंतर रंगना हेराथ होणार निवृत्त

श्रीलंकेचा डावखुरा दिग्गज फिरकीपटू रंगना हेराथ गॉलमध्ये पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर निवृत्त होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 4:13 AM

Open in App

कोलंबो : श्रीलंकेचा डावखुरा दिग्गज फिरकीपटू रंगना हेराथ गॉलमध्ये पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर निवृत्त होईल. श्रीलंका क्रिकेटने सोमवारी याची घोषणा केली.४० वर्षीय हेराथ इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर निवृत्ती स्वीकारण्याची शक्यता होती, पण त्याने १९९९ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध ज्या मैदानावर कसोटी पदार्पण केले त्याच मैदानावर निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले की, ‘आम्ही रंगनाच्या निर्णयाचा आदर करतो. श्रीलंका क्रिकेटचे हे मोठे नुकसान आहे.’हेराथने ९२ कसोटी सामन्यांत ४३० बळी घेतले असून तो विश्वविक्रमवीर मुथय्या मुरलीधरननंतर (८०० बळी) श्रीलंकेचा सर्वांत यशस्वी कसोटी गोलंदाज आहे. हेराथने आपला अखेरचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना मार्च २०१५ मध्ये इंग्लंडविरुद्ध वेलिंग्टनमध्ये खेळला होता. इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना ६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होईल. (वृत्तसंस्था)