मुंबई : अंध क्रिकेटपटूंच्या विभागीय राष्ट्रीय स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये बदल होणार आहे. यंदाच्या वर्षापासून अंध खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धा रणजी क्रिकेट फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्रने (सीएबीएम) या स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन, पुणे येथे आयोजित केलेल्या निवड चाचणी शिबिरातून अंतिम संघाची घोषणा करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रातून ४० पूर्णपणे आणि काही अंशतः अंध खेळाडू सहभाग झाले होते. तीन दिवस चाललेल्या या शिबिरातून डब्ल्यूबीसीसी (वर्ल्ड अंध क्रिकेट परिषद) आणि सीएबीआय (क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया) याच्या नियमांतर्गत महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली. 25 नोव्हेंबर 2018 ते 15 जानेवारी 2019 या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. महाराष्ट्र संघाला अ गटात स्थान देण्यात आले असून त्यांच्यासमोर आंध्र प्रदेश, चंढिगड, दिल्ली व बिहार यांचे आव्हान असणार आहे.
संघ - स्वप्नील वाघ (संघप्रमुख), सुनील राठोड (उप संघप्रमुख), अमोल खर्चे, अनिल बेलसरे, प्रवीण कारलुके, निलेश नानारे, उत्तम मरगज, राहुल महाले, अनिल येती, अभिजित शिरतोडे, अभिजित धोडे, विनोद महाले, उमेश जाधव, विकास खिल्लारे, सुशील पाटील, संदीप जाधव, दिनेश धांडे.
Web Title: Ranji format cricket competition for blind players, Maharashtra team released
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.