Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

रिंकूची रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यात तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 06:11 PM2024-10-20T18:11:56+5:302024-10-20T18:14:39+5:30

whatsapp join usJoin us
Ranji Rrophy UP vs Haryana Match Rinku Singh Brilliant Inning Yuzvendra Chahal Also Show batting talent | Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ranji Rrophy UP vs Haryana Match : देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या रणजी करंडक स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत अनेक भारतीय स्टार क्रिकेटर आपल्यातील धमक दाखवून देताना दिसत आहेत. आयपीएल स्टार आणि भारतीय टी-२० क्रिकेटमधील लोकप्रिय चेहरा असलेला रिंकू सिंह उत्तर प्रदेश संघाकडून खेळताना दिसत आहे. हरयाणा विरुद्धच्या सामन्यात त्याने तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत चाहत्यांचे लक्षवेधून घेतले आहे. 

 रिंकू सिंहचा जलवा, १० चौकार अन् ३ षटकारासह बहरली त्याची खेळी

हरयाणाविरुद्धच्या सामन्यात उत्तर प्रदेशच्या संघाकडून सलामीवीर आर्यन जुयाल याने चांगली बॅटिंग केली. पण त्याला अन्य खेळाडूंची साथ लाभली नाही. मध्य फळीतील फलंदाज अगदी स्वस्तात बाद झाले. संघाची अवस्था ३ बाद ४३ धावा अशी असताना रिंकू सिंह फलंदाजीला आला. त्याने आर्यन जुयालच्या साथीनं संघाच्या डावाला आकार दिला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी १६२ धावांची खेळी केली. रिंकू सिंह अगदी आक्रमक अंदाजात फटकेबाजी करताना पाहायला मिळाले. त्याने ११० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची खेळी केली. त्याला शतक झळकावण्याची संधी होती. पण त्याचे शतक ११ धावांनी हुकले.

फिनिशरच्या रुपात टीम इंडियात पक्की केलीये आपली जागा

रिंकू सिंह हा मर्यादित षटकांच्या सामन्यात टीम इंडियाचा नियमित सदस्य झाल्याचे दिसते. भारतीय टी-२० संघाचा तो अविभाज्य भाग असतो. आयपीएलमध्ये अशक्यप्राय वाटणाऱ्या सामन्याला कलाटणी देत त्याने टीम इंडियात फिनिशरच्या रुपात आपली जागा पक्की केलीये. रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याचा आक्रमकच अंदाज पाहायला मिळत आहे. 

चहलची फिफ्टी थोडक्यात हुकली



हरयाणाच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४५३ धावा काढल्याचे पाहायला मिळाले. या संघाकडून हिमांशू राणा ११४ (१७६) आणि धीरू सिंग १०३(२५६) या दोघांनी शतकी खेळी केल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी संघाला जबरदस्त प्लॅटफॉर्म सेट करून दिला. त्यानंतर तळाच्या फलंदाजीत फिरकीपटू युझवेंद्र चहल याने आपल्या भात्यातील तुफान फटकेबाजी दाखवून दिले. युझवेंद्र चहल याने १५२ चेंडूंचा सामना करताना ४८ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ६ चौकारांचा समावेश होता. त्याच अर्धशतक अवघ्या २ धावांनी हुकलं असलं तरी त्याची ही खेळी लक्षवेधून घेणारी अशीच होती. कारण प्रथम श्रेणी क्रिकेटध्ये त्याने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. दमदार बॅटिंगनंतर तो गोलंदाजीत जादू दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.

Web Title: Ranji Rrophy UP vs Haryana Match Rinku Singh Brilliant Inning Yuzvendra Chahal Also Show batting talent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.